वेरूळ-अजिंठा महोत्सव फेबु्रवारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:24 IST2018-01-09T00:23:52+5:302018-01-09T00:24:08+5:30

वेरूळ-अजिंठा महोत्सव ९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

The Verul-Ajantha Festival in February | वेरूळ-अजिंठा महोत्सव फेबु्रवारीत

वेरूळ-अजिंठा महोत्सव फेबु्रवारीत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वेरूळ-अजिंठा महोत्सव ९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त
डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.
फेबु्रवारी महिन्यात महोत्सव घेण्याबाबत ६ जानेवारी रोजी सर्व विभाग प्रतिनिधींची बैठक झाली. कलाकार कोण असावेत, ठिकाण कुठे असावे याबाबत बैठकीत चर्चा झाली. वेरूळ येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्याचा विचार सुरू आहे. विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल, बीबी का मकबरा, कलाग्राम या ठिकाणांसह वेरूळ लेणी प्रांगणाची पाहणी मागील आठवड्यात करण्यात आली. कलाग्राम वगळता उर्वरित तिन्ही स्थळांपैकी एका ठिकाणी महोत्सव होणे शक्य आहे. गेल्यावर्षी ३ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. यावर्षी तेवढी रक्कम उभी करणे अवघड आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये हा महोत्सव पार पडेल, याबाबत विचार सुरू आहे.

Web Title: The Verul-Ajantha Festival in February