उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलिवर रुग्णवाहिका आदळली

By Admin | Updated: November 29, 2015 23:17 IST2015-11-29T23:10:31+5:302015-11-29T23:17:29+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील खामगाव पाटीजवळ उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर रुग्णवाहिका आदळली आणि त्याचवेळी उस्मानाबादहून कळंबकडे जाणारी जीपही

The vertical tractor trolley ambulance started | उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलिवर रुग्णवाहिका आदळली

उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलिवर रुग्णवाहिका आदळली


उस्मानाबाद : तालुक्यातील खामगाव पाटीजवळ उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर रुग्णवाहिका आदळली आणि त्याचवेळी उस्मानाबादहून कळंबकडे जाणारी जीपही ट्रॉलीवर आदळल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दोन गर्भवती महिलांसह १३ जण जखमी झाले़ जखमींवर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, गंभीर जखमी दोघांना सोलापूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे़ हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला असून, या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (क्ऱएम़एच़२६- आऱ९००४) ही शनिवारी रात्रीच्या सुमारास गरोदर मातांना घेवून उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयाकडे निघाली होती़ ही रुग्णवाहिका भडाचीपाटी जवळ आली असता रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली रुग्णवाहिकेच्या चालकाला दिसली नाही़ परिणामी रुग्णवाहिका ट्रॉलीवर धडकली़ त्याचवेळी उस्मानाबादहून कळंबकडे निघालेली जीप (क्ऱएम़एच़१४- २६७८) आली आणि ती जीपही त्या ट्रॉलीवर आदळली़ या अपघातात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ प्रविण यादव यांच्यासह गणेश भोसले (वय-२७), शरद रितापुरे (वय-३४ दोघे रा़ मंगरूळ), श्रीराम पवार (वय-३५ रा़ जवळा), गुणवंत विखे (वय-३५ रा़सांगवी), संदीप बारबोले (वय-३०), गिरजाबाई बारबोले (वय-५५), पल्लवी बारबोले (वय-२० सर्व रा़ कसबे तडवळे), प्रतिभा देशमुख (वय-३६), विष्णू क्षीरसागर (वय- ३५), श्रध्दा साठे (वय-२६), सुरेखा तिवारी (वय-२९ सर्व रा़ढोकी) व इतर एक अनोळखी हे १३ जण जखमी झाले़ अपघाताची माहिती मिळताच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलाविण्यात आली़ रुग्णवाहिकेतील डॉ़ महेश घोळवे आणि चालक विकास चंदनशिवे यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने यंत्रणा हलवून जखमींवर उपचार केले़ यातील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे रेफर करण्यात आले होते़ तर गरोदर मातांना स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: The vertical tractor trolley ambulance started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.