शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
4
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
5
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
6
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
7
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
8
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
9
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
10
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
11
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
12
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
14
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
15
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
16
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
17
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
18
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
19
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
20
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीविक्रेत्याच्या मुलीला व्हायचंय डॉक्टर!

By admin | Updated: June 18, 2014 01:42 IST

आशपाक पठाण , लातूर कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य़ मुलं अभ्यास करतात की नाही काय हे बघायला पालकाला वेळही नाही़

आशपाक पठाण , लातूर
कुटुंबात आठराविश्व दारिद्र्य़ मुलं अभ्यास करतात की नाही काय हे बघायला पालकाला वेळही नाही़ सकाळी ६ वाजता भाजीपाल्याचा गाडा घेऊन बाहेर पडणारे पालक रात्री कधी दहा तर कधी १२ वाजता घरी पोहचतात़ पण मुले शिकली पाहिजेत, यासाठीच जिवाचं रान करीत शालेय साहित्यांसाठी कधीच नकार दिला नाही़ पालकांच्या कष्टाचं चिज व्हावं, यासाठी घरात मोठी असलेल्या मुलीने दहावीच्या परिक्षेत ८९ टक्के गुण घेऊन यश संपादन केले़ ९५ ते ९७ टक्के गुणाची अपेक्षा बाळगून असलेली निलोफर शेख कमी गुण पडल्याची खंत व्यक्त करीत डॉॅक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे़
भाजीविक्रीच्या व्यवसायातून वडिल दररोज २०० ते ३०० रूपये कमावतात़ एकट्या कमावत्या व्यक्तीवर घरातील ९ जणांचा भाऱ आई, दोन बहिणी, पत्नी, तीन मुले असा परिवाऱ निलोफर शेख घरात थोरली़ दोन भाऊ एक आठवी व दुसरा नववीच्या वर्गात शिक्षण घेतोय़ तीन मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह भाजीच्या गाड्यावर भागवायचा असल्याने शाळेतील शिक्षणाशिवाय इतर सोय नव्हती़ कोणत्याच विषयासाठी खाजगी शिकवणी वर्गाच्या दारात पायही ठेवला नाही़ लातूर शहरातील चौधरी नगर भागातील सय्यद अख्तरअली शाह उर्दु शाळेत शिक्षण घेत असलेल्या निलोफरला मुख्याध्यापक मजहर शेख यांच्यासह इतर विषयाच्या शिक्षकांनी नेहमीच मार्गदर्शन केले़ घरापासून जवळपास एक किलोमीटरचे अंतर तुडवत निलोफर शाळा गाठायची़आईचे शिक्षण दहावीपर्यंत पण तिला उर्दु भाषेचे ज्ञान नसल्याने आईनेही कधी अभ्यासात लक्ष दिले नाही़ शिक्षण चांगलं घ्या़़़ तुम्हाला मोठं व्हायचंय़़़ एवढेच शब्द आईचे ठरलेले असतात, असे निलोफर सांगत होती़
आता विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून डॉक्टर बनण्यासाठी जिद्दीने अभ्यास करणार आहे़ पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यासात रमणाऱ्या निलोफरच्या यशाचं कौतुक शाळेत करण्यात आले़ वडिल इस्माईल शेख व निलोफरचा संस्थेचे सचिव हाजी बशीर शेख यांनी सत्कार केला़
शाळा करणार मदत़़़
एच़पी़ शैक्षणिक संकुलाचे सचिव हाजी बशीर शेख म्हणाले, निलोफरच्या शिक्षणासाठी संस्थेकडून मदत करण्यात येईल़ अर्थिक अडचणीमुळे तिचे शिक्षण बंद पडू दिले जाणार आहे़ पालकाची अर्थिक परिस्थिती बिकट आहे़ मुलीमध्ये शिक्षणाची जिद्द आहे, त्यामुळे शाळेकडून मदतीचा हात दिला जाईल़
शिकेल तेवढे शिकविणाऱ़़
माझ्या मुलीला शिक्षणाची जिद्द आहे़ वर्षभर तिने कधीच कुठल्या पुस्तकासाठी हट्ट धरला नाही़ तिने स्वत:हून अभ्यास केला़ घरात नऊ जणांचे कुटुंब आहे,मी एकटा कमावता असल्याने जास्तीचा खर्चही करणे शक्य नाही़ सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करतो़ यापुढे अजून जास्तीची मेहनत करीऩ मुलगी जिथवर शिकेल तिथवर तिला शिकविणार, असे भावूक झालेले पालक इस्माईल शेख यांनी सांगितले़