‘वाहन ढकल’ मोर्चा

By Admin | Updated: July 7, 2014 00:12 IST2014-07-06T23:46:43+5:302014-07-07T00:12:51+5:30

लातूर : युपीए सरकारवर बेजबाबदार आरोप करीत महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या एनडीए सरकारने महिनाभरात रेल्वे, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

'Vehicle Stuck' Front | ‘वाहन ढकल’ मोर्चा

‘वाहन ढकल’ मोर्चा

लातूर : युपीए सरकारवर बेजबाबदार आरोप करीत महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या एनडीए सरकारने महिनाभरात रेल्वे, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीचा निर्णय घेतला आहे. याचा निषेध जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘वाहन ढकल’ मोर्चा काढून केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘मोदी, हाय हाय’ची जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ‘वाहन ढकल’ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे व आमदार वैजनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांना केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाने एकामागून एक जीवनावश्यक वस्तूंचा दर वाढविण्याचा सपाटाच लावला आहे. सुरुवातीला रेल्वे प्रवासी भाड्यात दरवाढ केली. आता पेट्रोल, डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ करून जनतेला आर्थिक संकटात ढकलले आहे.
तत्कालीन काँग्रेस सरकारवर बेजबाबदार आरोप करणाऱ्या एनडीएतील मंत्री महागाईच्या विषयावर मूग गिळून गप्प आहेत. या मंत्र्यांची दुटप्पी भूमिका आहे, असा आरोपही या निवेदनात काँग्रेसने केला आहे.
मोर्चात काँग्रेसचे जि.प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतीताई पवार, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष मनोज चिखले, मांजरा कारखान्याचे चेअरमन धनंजय देशमुख, सेवादलाचे अध्यक्ष भानुदास डोके, मनपा स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री, जि.प. सदस्य दगडूसाहेब पडिले, किसनराव लोमटे, सहदेव मस्के, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, सुधाकर साळुंके, पप्पू देशमुख, श्यामराव सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, सांब महाजन, बिभीषण सांगवीकर, अमोल शिंदे, रोहन माने, अ‍ॅड. राजेश खटके, संजय जगताप, अविनाश साबळे, अनिल पवार, निखिल लोहकरे, शरद देशमुख, संतोष सूर्यवंशी, दत्ता मस्के, पप्पू घोलप, बाळासाहेब कदम, रामराव ढगे, अनिल पवार, हणमंत जगदाळे, शफी शेख, शंकर पाटील, गणेश घोलप, अ‍ॅड. फारुक शेख, असिफ बागवान आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
दुचाकी ढकलल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेल्या. सकाळी ११.३० वाजता निघालेला हा मोर्चा दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘मोदी, हाय हाय...’ची घोषणाबाजी करून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: 'Vehicle Stuck' Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.