‘मॉर्निंग वॉक’साठी निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला वाहनाची धडक
By Admin | Updated: June 22, 2014 00:49 IST2014-06-22T00:45:06+5:302014-06-22T00:49:00+5:30
सिल्लोड : मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना शनिवारी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील औरंगाबाद नाक्यावर घडली

‘मॉर्निंग वॉक’साठी निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला वाहनाची धडक
सिल्लोड : मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना शनिवारी पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथील औरंगाबाद नाक्यावर घडली. यात प्रभाकर अंबादास प्रशाद (६०) हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी उषाबाई प्रभाकर प्रशाद (५६) दोघे रा. प्रशादनगर सिल्लोड ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उषाबाई प्रशाद ही महिला गंभीर जखमी झाल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. दरम्यान, प्रभाकर प्रशाद यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघात प्रकरणी मयताचा भाऊ विजय प्रशाद यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख हबीब करीत आहेत.