जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक धास्तावले
By Admin | Updated: July 22, 2014 00:17 IST2014-07-21T23:41:19+5:302014-07-22T00:17:49+5:30
अकोला नि : जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्यांसह भाजीपाला उत्पादानावर मोठा परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक धास्तावले
अकोला नि : जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्यांसह भाजीपाला उत्पादानावर मोठा परिणाम झाला आहे. अकोला निकळक परिसरात अल्पशा पाऊस पडला. भाजीपाल्यासाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने लावलेला भाजीपाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांंची तारांबळ उडत आहे. परिसरात सर्वच भाज्यांचे भाव वधारले आहे. त्यामुळे जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकरी भाज्यापाल्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करून चांगले उत्पन घेत असतात. वेळेवर पाऊस होत नसल्याने पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. नवीन पालेभाज्या बाजारात येण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे परिसरात भाज्याचे भाव वाढले आहेत. वांगे ५० रूपये किलो, टमाटे ६० रूपये किलो, मिरची ६० रूपये किलो, मेथी १० व कोथिंबिरची एक जुडी १५ रूपये, कारले १५ रूपये पावशेर, पालकची एक जुडी १०रूपये, फुलकोबी १५ रूपये पावशेर, असे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. गेल्या आठवडी बाजारात असा भाव असल्याने गृहिणींनी भाजीपाल्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र बदनापूरच्या आठवडी बाजारात बघायला मिळाले. अनेकांनी भाजीपाला खरेदीवर मर्यादा लावल्याचे सांगितले.
पावसाने पाठ फिरविल्याने सर्वच भाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. अनेक गृहिणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करत होत्या.
मात्र भाव वाढल्याने गृहिणींनी भाजीपाल्याची खरेदी कमी केली आहे. आमच्या व्यवसायावर याचा चांगलाच परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)