भाजीपाला मार्केट ठप्प; जाधववाडीत शुकशुकाट
By Admin | Updated: July 12, 2016 01:04 IST2016-07-12T00:31:26+5:302016-07-12T01:04:29+5:30
औरंगाबाद : जाधववाडी कृ षी उत्पन्न बाजार समिती परिसरातील फळे, भाजीपाला मार्केट बंदला सोमवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

भाजीपाला मार्केट ठप्प; जाधववाडीत शुकशुकाट
औरंगाबाद : जाधववाडी कृ षी उत्पन्न बाजार समिती परिसरातील फळे, भाजीपाला मार्केट बंदला सोमवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंदची पूर्वकल्पना असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फ ळे-भाजीपाला बाजारात आणण्याचे टाळले. मात्र, तरीही ‘विकेल तेवढा आणि मिळेल त्या दराने’ यानुसार मालाची विक्री करून माघारी फिरण्याची वेळ अनेकांवर आली. या बंदमुळे आवक घटल्याने फळे व भाजीपाल्यांच्या दरवाढीला हातभार लागत आहे.
अडत्यांनी शेतकऱ्यांकडून अडत न घेता खरेदीदारांकडून घ्यावी, या राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात ८ जुलैपासून जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अडत्यांनी बेमुदत बंदची हाक दिली. फळे व भाजीपाला अडत व्यापारी असोसिएशननेदेखील याच मुद्यांवर शनिवारपासून बेमुदत बंद पुकारला; परंतु याविषयी माहिती नसल्याने रविवारी अनेक शेतकऱ्यांनी फळे-भाजीपाला अडत बाजारात आणला. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अडत्यांनी गाडीतून माल उतरवून घेतला; परंतु सोमवारी बंदची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे सकाळी अनेक शेतक ऱ्यांचा माल उतरवून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना माघारी परतावे लागले. बंदमुळे भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागेल.