वसमत बनतेय गुटखा विक्रीचा अड्डा

By Admin | Updated: August 7, 2014 23:29 IST2014-08-07T23:07:27+5:302014-08-07T23:29:54+5:30

वसमत : शासनाने गुटखा विक्री बंद केल्यापासून वसमतमध्ये गुटख्याला मोकळे रान मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Vatamatte Gutkha for sale | वसमत बनतेय गुटखा विक्रीचा अड्डा

वसमत बनतेय गुटखा विक्रीचा अड्डा

वसमत : शासनाने गुटखा विक्री बंद केल्यापासून वसमतमध्ये गुटख्याला मोकळे रान मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पूर्णा व परभणी येथील गुटख्याचे मुख्य सूत्रधार वसमत येथे मुख्य केंद्र स्थापन करून मराठवाडाभर गुटखा वितरण करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. वसमत येथे रेल्वे व ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून पोहोचत असून फेरीवाल्यांच्या माध्यमातून राजरोस गुटखा वितरित होत आहे.
कधी काळी गुटख्यासाठी पूर्णा हे प्रसिद्ध झाले होते. आता सुरक्षेच्या दृष्टीने वसमतकडे मोर्चा वळविला आहे. वसमतच्या रेल्वेस्थानकावर हैदराबाद किंवा विदर्भ मार्ग गुटखा प्रचंड प्रमाणात उतरवला जात आहे. रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या गढी मोहल्ला भागात गुटख्याचे मुख्य गोदामही उभे करण्यात आलेले आहे. रात्री-बेरात्री चारचाकी वाहनातून परभणी- पूर्णा भागातील युवकांच्या टोळ्या शहरात दाखल होत असून या टोळ्यांच्या देखरेखेखाली गुटखा गाडीत चढवणे व उतरवण्याचे काम होत असल्याचे वृत्त आहे.
शहरात गुटखा वितरण करण्यासाठी किमान ५० फेरीवाले तैनात करण्यात आलेले आहेत. हे फेरीवाले भर बाजारपेठेत राजरोसपणे दुचाकीवरून गुटखा पानटपरी, किराणादुकान व जर्दा स्टोअर्सवर पोहोचवत असतात. ग्रामीण भागात मिनी टेम्पोद्वारे किंवा बंद बॉडीच्या मिनी टेम्पोद्वारे गुटखा पोहोचवला जात आहे.
शहराच्या प्रत्येक पानटपरीवर गुटख्याच्या पुड्या लटकलेल्या पहावयास मिळतात. गुटाखा फेरीवाले तर पानटपरी वाल्यांना छापा पडणार नाही. वसमत येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी हैदराबाद येथून ट्रकद्वारे आलेला गुटख्याचा मोठा साठा पकडला. ट्रान्सपोर्टद्वारे हैदराबाद येथून गुटखा ने-आण होत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. दोन महिन्यापुर्वी गढी मोहल्ला भागातील गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी छापा मारुन साठा जप्त केला होता. रेल्वे स्थानकावर उतरललेला गुटखाही रेल्वे पोलिसांनी वसमतहून जप्त करून नेला होता. पोलिस तपास योग्य दिशेने व योग्य ठिकाणापर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तर मनुष्यबळ नसल्याचे नेहमीचेच कारण सांगत हातावर हात ठेवून बसणाऱ्या अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाकडेही लक्ष लागले

Web Title: Vatamatte Gutkha for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.