वृक्षांमध्ये ‘त्यांना’ दिसला वासुदेव
By Admin | Updated: June 28, 2016 00:53 IST2016-06-28T00:40:15+5:302016-06-28T00:53:17+5:30
औरंगाबाद : वृक्षांमध्ये ‘वासुदेव’ पाहण्याचा दृष्टिकोन स्वाध्याय परिवाराचा असतो. हाच दृष्टिकोन समोर ठेवून स्वाध्याय परिवाराच्या माधवी वृक्ष मित्रमंडळाने एन-७ येथील

वृक्षांमध्ये ‘त्यांना’ दिसला वासुदेव
औरंगाबाद : वृक्षांमध्ये ‘वासुदेव’ पाहण्याचा दृष्टिकोन स्वाध्याय परिवाराचा असतो. हाच दृष्टिकोन समोर ठेवून स्वाध्याय परिवाराच्या माधवी वृक्ष मित्रमंडळाने एन-७ येथील महापालिका शाळेजवळ तब्बल एक हजार झाडांची जोपासना केली आहे. काही वर्षांपूर्वी ओसाड असणारा हा परिसर आता हिरवाईने डोलत आहे.
पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील भाविकांनी माधवी वृक्ष मित्रमंडळाची स्थापना केली आहे. दहा वर्षांपूर्वी या मंडळास सिडको प्रशासनाने एन-७ येथील महापालिका शाळा परिसरातील जागा वृक्ष लागवडीसाठी देण्यात आली होती. सिडकोचे हस्तांतरण झाल्यानंतर महापालिकेनेही हा निर्णय कायम ठेवला. स्वाध्याय परिवाराने वृक्ष लागवडीचे काम हाती घेण्यापूर्वी हा परिसर ओसाड होता. परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचे सांडपाणी या जागेवरील खड्ड्यांत जमा होत असे. त्यामुळे तेथे कायम दुर्गंधी पसरलेली असे. विद्यार्जन करणारे विद्यार्थी व शिक्षकांना शाळा सुटेपर्यंत नाक मुठीत धरूनच राहावे लागे.
वृक्ष संगोपनाच्या कार्यासाठी माधवी वृक्ष मित्रमंडळातर्फे कोणाकडूनही वर्गणी, देणगी अथवा आर्थिक मदत घेतली जात नाही. ‘भक्ती ही सामाजिक शक्ती आहे’ या तत्त्वावर वृक्ष संगोपन केले जाते. वृक्ष संगोपन करताना पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, अर्थार्जन, अशी कसलीही लालसा बाळगली जात नाही.