शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ-अजिंठा महोत्सव यंदा बारगळणार?

By admin | Updated: November 6, 2014 01:15 IST

औरंगाबाद : पर्यटनवाढीच्या दृष्टीने, तसेच पर्यटकांसह औरंगाबादच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून सुरू झालेला व अधूनमधून होणारा नृत्य-संगीताचा वेरूळ महोत्सव

औरंगाबाद : पर्यटनवाढीच्या दृष्टीने, तसेच पर्यटकांसह औरंगाबादच्या रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून सुरू झालेला व अधूनमधून होणारा नृत्य-संगीताचा वेरूळ महोत्सव यंदा होणार की नाही,याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जगप्रसिद्ध कैलास लेण्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथे हा महोत्सव सुरू झाला. रात्रीच्या वेळी आणि ऐन थंडीच्या दिवसात होणारा महोत्सव गैरसोयीचा ठरू लागल्याने नंतर तो २००२ पासून औरंगाबाद शहरातील विद्यापीठ परिसरात १७ व्या शतकात बांधल्या गेलेल्या ऐतिहासिक सोनेरी महलच्या पार्श्वभूमीवर वेरूळ-अजिंठा औरंगाबाद महोत्सव या नावाने सुरू झाला. यामध्ये स्थानिक कलावंतांबरोबरच देशातील प्रतिष्ठित आणि नामांकित कलावंतांना पाचारण करण्यात येते. ऐतिहासिक स्थळाच्या पार्श्वभूमीवर बहरत असलेला हा महोत्सव गेल्या वर्षी होऊ शकला नाही. आर्किटेक्ट असलेल्या आणि कलेमध्ये रुची असलेल्या जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी हा महोत्सव पुन्हा सुरू करण्याबाबत सहा महिन्यांपूर्वी सूतोवाच केले होते; मात्र नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही वेळ मिळाला नाही. वेरूळ-अजिंठा औरंगाबाद फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या समितीची बैठकही यासंदर्भात होऊ शकली नाही. राज्य पर्यटन महामंडळाचे सहकार्य असलेला हा महोत्सव यंदा त्यांच्याकडूनही दुर्लक्षित राहिला. हा महोत्सव साधारणत: डिसेंबर- जानेवारी महिन्यात होतो. आॅक्टोबर महिन्यापासून पर्यटन राजधानीतील सीझन चालू होतो. देश- विदेशातील नागरिक भेटी देतात. महोत्सवाच्या तारखांची आधी काही काळ प्रसिद्धी झाली तर ते पर्यटकांच्या सोयीचे असते. मात्र आता नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी या महोत्सवाबाबत एकही बैठक किंवा अगदी चर्चाही झालेली नाही. त्यामुळे महोत्सवाच्या तारखा ठरून त्याची प्रसिद्धी, तसेच कलावंतांच्या तारखा घेण्याचे अवघड काम होणे अशक्यच दिसत आहे. महोत्सव करावयाचा झाल्यास त्याची युद्धपातळीवर तयारी करावी लागेल, अन्यथा यंदाचा महोत्सव बारगळल्यात जमा आहे. या संदर्भात राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 1२०१२ मध्ये २६ ते २९ जानेवारीदरम्यान झालेल्या फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर, बासरीवादक पं. रोणू मुजुमदार, सुफी व गझल गायक कैलास खेर आदींसह बड्या कलावंतांनी हजेरी लावून हा सोहळा दिमाखदार करण्यात वाटा उचलला. 2अर्थात त्यावेळी दिलीप शिंदे या कलाप्रेमी अधिकाऱ्याच्या पुढाकारामुळे हा महोत्सव होऊ शकला. २४०० चौरस फुटाचे भव्य स्टेज आणि सुमारे दहा हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हा महोत्सव खऱ्या अर्थाने रंगला होता; मात्र २०१३ साली हा महोत्सव होऊ शकला नाही. निधीची अडचण आणि इतर सबबी सांगण्यात आल्या. त्यामुळे औरंगाबादच्या रसिकांना दर्जेदार कलावंतांचा आविष्कार पाहण्या-ऐकण्याची संधी मिळाली नाही. हा महोत्सव घेण्याचा विचार जाहीर केला आहे. आता या समितीची बैठक घेऊन त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहायला हवे. समितीच्या बैठकीनंतरच काहीतरी ठरेल.- विक्रमकुमार, जिल्हाधिकारी