औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावर नागरिकांनी सुचविले विविध उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:15 IST2018-03-05T14:13:35+5:302018-03-05T14:15:37+5:30
क्रांतीचौकातील स्वातंत्र्य संग्राम स्मारक परिसरात एकत्र आलेल्या नागरिकांनी भविष्यातील कचरा प्रश्नावर विविध उपाय सुचविले.

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावर नागरिकांनी सुचविले विविध उपाय
औरंगाबाद : नारेगाव येथील परिस्थितीने औरंगाबाद शहर गेल्या १७ दिवसांपासून कचराकोंडीत आहे. हा प्रश्न आज ना उद्या सुटेल; परंतु भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद््भवणारच नाही, यासाठी प्रत्येक नागरिकाचा वाटा महत्त्वाचा आहे. ही भूमिका लक्षात घेऊन रविवारी (दि.४) क्रांतीचौकातील स्वातंत्र्य संग्राम स्मारक परिसरात एकत्र आलेल्या नागरिकांनी भविष्यातील कचरा प्रश्नावर विविध उपाय सुचविले.
याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन, नगसेवक राजू वैद्य, सुरेंद्र कुलकर्णी, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सारंग टाकळकर, श्रीकांत उमरीकर, श्रीपाद टाकळकर, निवृत्त पोलीस अधिकारी नरेश मेघराजानी, डॉ. रश्मी बोरीकर, शीतल रुद्रवार, आशा कोरान्ने, सुमित खांबेकर, समीर राजूरकर, डॉ. राघवेंद्र अष्टपुत्रे, हेमंत अष्टपुत्रे, मोहिंदर बाकरिया, गौरी पांडे, सुशांत पांडे, शरद लासूरकर, माधुरी लासूरकर, चंद्रकांत ढुमणे, आकाश ढुमणे, रवींद्र पाठक, अॅड. सचिन सुदामे, अनिल विधाते आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
असे सुचवले उपाय
- प्रत्येक वॉर्डात ओला कचरा जिरविण्यास प्राधान्य द्यावे.
- कचरावेचकांना एकत्र करून त्यांना ओळखपत्र देणे, त्यांची मदत घेणे.
- वार्डातील नागरिकांची मदत घेऊन कचरा प्रश्न हाताळणे.
- ओल्या कचर्यापासून घरातच खत निर्मिती क रण्यात यावी.
- ओल्या कचर्यापासून बायोगॅस तयार करून घरात वापरावा.
- मोठ्या संस्था, प्रकल्प, सोसायटी, रुग्णालयांनी स्वत:चा कचरा स्वत: जिरवावा.
- पुण्यातील सारस बागप्रमाणे नारेगावात खत, बायोगॅस निर्मिती करणे.
- ‘पोलीस मित्र’प्रमाणे स्वच्छता मित्र तयार करणे.
- शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे.