सावरकर जयंतीनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST2021-05-28T04:04:22+5:302021-05-28T04:04:22+5:30
औरंगाबाद : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती निमित्त २८ मे रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ...

सावरकर जयंतीनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम
औरंगाबाद : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती निमित्त २८ मे रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शहरातील समर्थनगर परिसरात सावरकर चौकातील स्वा. सावरकर पुतळा परिसरात गुरुवारी फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली.
शुक्रवारी स्वा. सावरकर जयंती सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीने सकाळी ८ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ ते ७ यावेळेत शहरातील ४ ठिकाणच्या स्वा. सावरकर चौकात अभिवादन करण्यात येणार आहे.
सायंकाळी समर्थनगर येथील सावरकर चौकात पुतळा परिसरात दिव्यांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच दुपारी ४.३० ते ५.३० वाजे दरम्यान जीवनगुरू भोगावकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन व्यास यांनी दिली.
स्वा. वि. दा. सावरकर प्रेमी मित्र मंडळातर्फे सकाळी ७ वाजता शहरातील विविध मान्यवर ऑनलाईन अभिवादन करणार आहेत. सायंकाळी समर्थनगर येथील सावरकर चौकात महाआरती करण्यात येणार आहे.
चौकट
पोलिसांना देणार अन्नाची पाकिटे
मी पण सावरकर मित्र मंडळातर्फे सकाळी शहरातील विविध भागात ड्युटीवर असणारे व पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अन्नाची पाकिटे वितरित करण्यात येणार आहे.