लसीकरणात घाटीत डॉक्टर आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:34+5:302021-02-05T04:22:34+5:30
औरंगाबाद : घाटीत रोज होणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण ५० टक्क्यांखालीच आहे. लस घेण्यात डॉक्टरच आघाडीवर आहेत. त्यातुलनेत इतर ...

लसीकरणात घाटीत डॉक्टर आघाडीवर
औरंगाबाद : घाटीत रोज होणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण ५० टक्क्यांखालीच आहे. लस घेण्यात डॉक्टरच आघाडीवर आहेत. त्यातुलनेत इतर कर्मचाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी शनिवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, आदी उपस्थित होते. डॉ. येळीकर म्हणाल्या, मनात कोणतीही भीती न बाळगता प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. भारतीयांनी विविध लसी यापूर्वी घेतलेल्या आहेत. लसीकरणामुळेच पोलिओ, देवी यासारखा आजारांवर विजय मिळविता आला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही लस महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्या म्हणाल्या.
घाटीत गेल्या १० दिवसांत ३८२ जणांचे लसीकरण झाले आहे. यात डॉक्टरांची संख्या २२८ आहे, तर अन्य कर्मचाऱ्यांची संख्या ही १५४ आहे. दररोज १०० जणांना डोस देण्याचे नियोजन असते. त्यातुलनेत ५० टक्केच्या घरात लसीकरण होत आहे.
प्रमाण वाढले
घाटीत २ हजार ७८८ कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. कर्मचाऱ्यांसाठी २ हजार डोस प्राप्त झालेले आहेत. दोन डोसनुसार यातून ९०० कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. लसीकरणाचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. आगामी दिवसांत आणखी प्रमाण वाढेल, असे नोडल ऑफिसर डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले.
फोटो ओळ...
घाटीत शनिवारी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली.