वैजापूरच्या तहसीलदार वंदना निकुंभ निलंबित

By Admin | Updated: May 3, 2016 01:12 IST2016-05-03T00:53:07+5:302016-05-03T01:12:44+5:30

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्याकडे टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदार वंदना निकुंभ यांच्या निलंबनाचे आदेश

Vaizapur Tehsildar Vandana Nirumba suspended | वैजापूरच्या तहसीलदार वंदना निकुंभ निलंबित

वैजापूरच्या तहसीलदार वंदना निकुंभ निलंबित


औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्याकडे टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदार वंदना निकुंभ यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी काढले. निकुंभ यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली.
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातून टँकर, विहीर अधिग्रहण, मग्रारोहयो कामे सुरूकरण्याची मागणी होत आहे. या मागणीकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या.
पालकमंत्री कदम यांनी तहसीलदाराची उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून निलंबित करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Vaizapur Tehsildar Vandana Nirumba suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.