Vaijapur Parishad Election Result 2025: वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपचे परदेशी विजयी; शिंदेसेनेच्या आमदारांच्या भावाचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:38 IST2025-12-21T13:37:21+5:302025-12-21T13:38:28+5:30
आमदार रमेश बोरनारे यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतदारांनी डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला

Vaijapur Parishad Election Result 2025: वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपचे परदेशी विजयी; शिंदेसेनेच्या आमदारांच्या भावाचा पराभव
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर): वैजापूर नगरपरिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी ६,२८८ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत वैजापूरची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांचे सख्खे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव केला.
बोरनारे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का
आमदार रमेश बोरनारे यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतदारांनी डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याने बोरनारे कुटुंबासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
पक्षनिहाय बलाबल
नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या २५ जागांसाठी झालेल्या मतदानात संमिश्र कल पाहायला मिळाला. यामध्ये भाजपने सर्वाधिक ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेने (शिंदे गट) १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ४ जागा पटकावल्या आहेत. जरी नगराध्यक्ष भाजपचा असला, तरी सभागृहात सत्तेसाठी इतर मित्रपक्षांची मदत महत्त्वाची ठरणार आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी:
नगराध्यक्ष: डॉ. दिनेश परदेशी, भाजपा
प्रभाग १- पारस घाटे, सुमैया बक्ष शिवसेना, भाजपा
प्रभाग २- मोनाली खैरे, विशाल संचेती भाजपा, भाजपा
प्रभाग ३- पूजा त्रिभुवन, रियाज अकील शेख राष्ट्रवादी, राष्ट्रवादी
प्रभाग ४- स्वप्नील जेजुरकर, संगीता राजपूत शिवसेना, भाजपा
प्रभाग ५- जयश्री चौधरी, साबेर खान, शिवसेना, शिवसेना
प्रभाग ६- दीपा राजपूत, ताहेर साबेर खान, भाजपा, शिवसेना
प्रभाग ७- राहुल त्रिभुवन, सविता चव्हाण, शिवसेना, भाजपा
प्रभाग ८- बाबासाहेब पुतळे, लता वाणी, शिवसेना, भाजपा
प्रभाग ९- अमिर अली सैय्यद, सुरेखा घाटे, शिवसेना, शिवसेना
प्रभाग १०- ज्योती जोशी, शे. हमीद कुरेशी भाजपा, शिवसेना
प्रभाग ११- दशरथ बनकर, सुवर्णा ठोंबरे, भाजपा, राष्ट्रवादी
प्रभाग १२- राजेश गायकवाड, जयश्री राजपूत, कविता शिंदे भाजपा (तीन्ही)