अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरदऱ्यात वाघाचा संचार ?

By Admin | Updated: December 7, 2015 00:59 IST2015-12-07T00:38:42+5:302015-12-07T00:59:59+5:30

अंबाजोगाई : शहरालगत मुकुंदराज, बुट्टेनाथ परिसरात वाघ दिसल्याच्या चर्चेने ग्रामस्थ व शेतकरी धास्तावले आहेत. अनेकांनी शेतात जाणेही टाळले आहे.

Vagha communication in the mountains of Ambajogai taluka? | अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरदऱ्यात वाघाचा संचार ?

अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरदऱ्यात वाघाचा संचार ?


अंबाजोगाई : शहरालगत मुकुंदराज, बुट्टेनाथ परिसरात वाघ दिसल्याच्या चर्चेने ग्रामस्थ व शेतकरी धास्तावले आहेत. अनेकांनी शेतात जाणेही टाळले आहे.
डोंगरदऱ्यात विस्तीर्ण झाडी आहे. ३०० एकरच्या या वनविभागाच्या परिसरात मोर, हरिण, कोल्हे, रानगाई, लांडगे, तडस, असे विविध प्रकारचे प्राणी या परिसरात सातत्याने आढळतात व त्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. दोन दिवसांपूर्वी कुरणवाडी तांडा येथील बबन राजाभाऊ आडे, अभय बळीराम आडे व अमोल शंकर आडे हे रात्री नऊ वाजता मोटारसायकलवरून दगडू तांडयाकडे जात होते. मुकुंदराज मंदिराजवळील घाटाच्या संरक्षण भिंतीजवळ वाघ दिसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या संदर्भात वनविभागाचे निरीक्षक एम. एस. मुंडे यांच्याकडे विचारणा केली असता ग्रामस्थांशी चर्चा करून चौकशी करू असे ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Vagha communication in the mountains of Ambajogai taluka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.