वडोदबाजार ग्रा.पं. तीच्या विकासकामात अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:05 IST2021-07-16T04:05:37+5:302021-07-16T04:05:37+5:30
फुलंब्री : तालुक्यातील वडोदबाजार ग्रामपंचायतच्या कारभारीकडून १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून झालेल्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप १५ पैकी ७ ...

वडोदबाजार ग्रा.पं. तीच्या विकासकामात अनियमितता
फुलंब्री : तालुक्यातील वडोदबाजार ग्रामपंचायतच्या कारभारीकडून १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून झालेल्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप १५ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. पंचायत समितीकडे तक्रार करून कामाच्या चौकशीची मागणी केली. नसता आंदोलन करण्याचा इशारा दिला.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून वडोदबाजार ग्रा.पं.ची ओळख आहे. अशा गावात आर्थिक अनियमितता होणे हे गावाच्या दृष्टीने योग्य नाही. १४ व्या वित्त आयोगाचा आलेला निधी वापरताना सरपंचांनी आपल्या नातेवाइकांच्या नावाने बिले काढली आहेत, असा आरोप ग्रा. पं. सदस्य प्रतिभा गोविंद पांडेजी, राणी शांताराम तोरणमल, कांचन आसाराम कोलते, शिवराम जगन्नाथ म्हस्के, शेख राजीक शेख रज्जाक, पांडुरंग बाबूराव मंदाडे, डॉ सुहास विलास वायकोस यांनी केला. अनियमितता झालेल्या कामाची चौकशी करून दोषीवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली. नसता २७ जुलैपासून जिल्हा परिषदसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला गेला आहे.
----
असे आहेत आरोप
गावातील नाली आठव गाळ न काढता नातेवाइकांच्या नावाने धनादेश काढला, ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नाही. विरोधी सदस्यांनी बैठकीत मांडलेले ठराव नोंद केले जात नाही. निवडणुकीत छापलेल्या बॅॅनरची रक्कम कोरोना काळात केलेल्या जनजागृती बॅनरच्या नावाखाली काढण्यात आली. ग्रामसभा न बोलावता मर्जीतील रोजगार सेवकाची नेमणूक करणे, मासिक सभेत चर्चा न करता मनमानी करून बिले काढली जाणे, असे आरोप सदस्यांनी केले आहेत.