कन्नड तालुक्यात तुटवड्यामुळे थांबले लसीकरणाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:21+5:302021-05-05T04:07:21+5:30
तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३ ग्रामीण रुग्णालयांमार्फत ५१ हजार ८०० जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ८ ...

कन्नड तालुक्यात तुटवड्यामुळे थांबले लसीकरणाचे काम
तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३ ग्रामीण रुग्णालयांमार्फत ५१ हजार ८०० जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ८ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती; मात्र लस उपलब्ध न झाल्याने ३० एप्रिलपासून लसीकरण पूर्णपणे बंद आहे. लसीकरण करून घेण्यासाठी अनेक जण केंद्रांवर चकरा मारीत आहेत; मात्र लस उपलब्ध नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.
पावणेदोन महिन्यात लसीकरणाचे सर्वात जास्त म्हणजे ६३.६ टक्के काम औराळा प्राथमिक आरोग्य केंद्राने तर सर्वात कमी म्हणजे उद्दिष्टाच्या ४४.४ टक्के काम वडनेर केंद्राने केले आहे. तालुक्यातील २५ हजार १६७ जणांना पहिली मात्रा तर २ हजार ९७४ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. तालुक्यात एकूण २८ हजार १४१ मात्रा देण्यात आल्या असून हे काम उद्दिष्टाच्या ५४ टक्के आहे.
चौकट
१२ केंद्रावर झालेले लसीकरण
औराळा केंद्रांतर्गत २७३३ मात्रा (६३.६ टक्के), चापानेर २०६२ मात्रा (४८ टक्के), चिकलठाण २ हजार ४५० मात्रा (५७ टक्के), चिंचोली २ हजार ६३५ (६१.३ टक्के), हतनूर २ हजार १७१ (५०.५ टक्के), करंजखेडा २ हजार २४२ (५२.१ टक्के), नाचनवेल २ हजार ५०७ (५८.३ टक्के), नागद १ हजार ९६६ (४५.७ टक्के), वडनेर १ हजार ९११ (४४.४ टक्के), ग्रामीण रुग्णालय कन्नड २ हजार ७५४ (६२.६ टक्के), ग्रामीण रुग्णालय पिशोर २ हजार ३८७ (५५.५ टक्के) व ग्रामीण रुग्णालय देवगाव २ हजार ३२३ (५२.८ टक्के)