फुलंब्री शहरात एकाच दिवशी साडेतीनशे नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:05 IST2021-04-11T04:05:07+5:302021-04-11T04:05:07+5:30

फुलंब्री : शहरात संत सावता माळी मंदिर सभागृहात शनिवारी कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. एकाच दिवशी साडेतीनशे नागरिकांनी लस ...

Vaccination of three and a half hundred citizens in a single day in the city of Fulbright | फुलंब्री शहरात एकाच दिवशी साडेतीनशे नागरिकांचे लसीकरण

फुलंब्री शहरात एकाच दिवशी साडेतीनशे नागरिकांचे लसीकरण

फुलंब्री : शहरात संत सावता माळी मंदिर सभागृहात शनिवारी कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. एकाच दिवशी साडेतीनशे नागरिकांनी लस टोचून घेतली आहे.

फुलंब्री नगर पंचायत, ग्रामीण रुग्णालय तसेच जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे शहरात कोविड लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संत सावता माळी सभागृहात नगराध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. याठिकाणी उपजिल्हाधिकारी पूजा पाटील, तहसीलदार शीतल राजपूत यांनी भेट दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजीत खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले, नोडल अधिकारी डॉ. सतीश साबळे आदी यावेळी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : फुलंब्री शहरात आयोजित कोविड लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

100421\rauf usman shaik_img-20210410-wa0028_1.jpg

फुलंब्री शहरात आयोजित कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title: Vaccination of three and a half hundred citizens in a single day in the city of Fulbright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.