पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:46+5:302020-11-28T04:16:46+5:30
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांतील सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्ड बॉय व दवाखान्यातील काम करणारे सर्व ...

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांतील सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्ड बॉय व दवाखान्यातील काम करणारे सर्व कर्मचारी यांची माहिती जवळ असलेल्या शासकीय रुग्णालयात तत्काळ द्यावी. जेणेकरून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीपासून ते वंचित राहणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले आहे. कोरोना लसीकरण अनुषंगाने जिल्हा कार्यदल समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जि.प. सीईओ मंगेश गोंदावले, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती.
आठवडी बाजार भरविण्यास मनाई
औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील, तालुक्यात, गावात भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे मतदान कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सिल्लोडमधील पालोद, कन्नडचे पिशोर, हतनूर, फुलंब्री, पैठणमधील विहामांडवा, आडूळ, ढोरकीन, लोहगाव, गंगापूरमधील सिद्धनाथ वाडगाव, कायगाव, वैजापूरमधील मनूर, धोंदलगाव, सोयगाव या ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.