सोयगावात १७५ जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:04 IST2021-03-17T04:04:37+5:302021-03-17T04:04:37+5:30
सोयगाव तालुक्यात मंगळवारी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ४ केंद्रांवर ...

सोयगावात १७५ जणांना लसीकरण
सोयगाव तालुक्यात मंगळवारी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ४ केंद्रांवर १७५ जणांना लस देण्यात आली. यात सोयगाव ग्रामीण रुग्णालयात २१, जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५, बनोटी ३५ आणि सावळदबारा ७० यांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत ७४४ जणांना लस टोचण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी दिली. लसीकरणासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर कसबे, डॉ. केतन काळे यांनी पुढाकार घेतला. गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, आरोग्य विस्तार अधिकारी हिरामण गोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी लसीकरण केंद्रांना भेट दिली.
छायाचित्र ओळ :
गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे लसीकरण प्रक्रियेची माहिती घेताना.