दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर

By Admin | Updated: May 22, 2014 00:16 IST2014-05-22T00:09:51+5:302014-05-22T00:16:35+5:30

जालना: प्रशासनाचे उदासीन धोरण व जलशुद्धीकरणाची तोकडी यंत्रणा यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश जनतेला दूषित पाणीपुरवठा होतो आहे.

Use of contaminated water for drinking | दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर

दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर

 जालना: प्रशासनाचे उदासीन धोरण व जलशुद्धीकरणाची तोकडी यंत्रणा यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश जनतेला दूषित पाणीपुरवठा होतो आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पाणी मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय पेयजल योजना आणि निर्मल भारत योजनेतून पाणीपुरवठा योजना दिली जाते. अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या योजना कागदावरच आहेत. ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. परिणामी, साथीच्या आजार बळावण्याची भीती कायम असते. हातपंप, सार्वजनिक विहिरी, कूपनलिका यामधून ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. हे पाणी पिण्यासाठी योग्य का अयोग्य आहे, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया म्हणावी तशी पार पाडली जात नाही. प्रशासन शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधितांना वारंवार सूचना करते. परंतु या सूचनांची अंमलबजावणी कधीतरीच होते. ग्रामीण भागात जलशुध्दीकरण केंद्रच नाही जिल्ह्यात जाफराबाद ,आन्वा, पिंपळगाव रेणुकाई, भारज येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. इतर तालुक्यांत गंभीर परिस्थिती आहे. इतर तालुक्यांत अशुद्ध पाणीपुरवठा होतो, हे वास्तव आहे. शासकीय प्रयोगशाळेतील अधिकार्‍यांकडूनही याचे उत्तर मिळू शकले. त्यांनीही चुप्पीच साधली. जारफराबादव्यतिरिक्त सर्वच जलशुध्दीकरण केंद्र बंद असल्याने ग्रामस्थांना अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पंचायत राजविभाग, स्थानिक पातळीवर असलेली प्रशासनाचा लालफितीचा कारभार ग्रामस्थांच्या जिवावर बेतण्याची भीती आहे. जिल्ह्यात किती जलशुध्दीकरण केंदे आहेत, याची माहिती उपमुख्य कार्यकारी अभियंता यांना नाही. एकमेकांना विचारुन थातूरमातूर उत्तरे दिली. शेवटी बराच वेळानंतर काही माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे यासाठी शासनाने राष्ट्रीय पेयजल योजनेतून केंद्र व राज्याचा निधी आणि लोकसहभागातून कामे करावी लागते. २०१३ पर्यंत २० कोटी रूपये प्रात्त झाले. १२ कोटी रुपये खर्च झाला. उर्वरित कामे सुरु असल्याचे सांगण्यात आले. २०१४ सालचा निधी प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी पाणी तपासणीसाठी नव्याने अंबड जाफराबाद आणि मंठा येथे प्रयोग शाळांची उभारणी करण्यात आली आहे. एप्रिल ते मे महिन्यात एकूण १०९५ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३१० नमुने दूषित निघाले. यामध्ये सर्वात जास्त थरमोटॉलरन्स हा जंतु मोठ्या प्रमाणात आढळून आला.यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, जाँडीस आदी आजारांची शक्यता असल्याचे कनिष्ठ वैज्ञालिक सी.आर. नरवडे यांनी सांगितले. ग्रामीण भागात जलशुध्दीकरण केंद्र नसल्याने ग्रामीण दूषित पाण्याचे नमुने जास्त आढळतात. जिल्हातील ४० आरोग्य केंद्रातील पाणी तपासणी वेळोवेळी केली जाते. (प्रतिनिधी) ब्लिचिंग पावडरची व क्लोरिन व द्रावणाची तपासणी, आयोडीनयुक्त नमुन्याची तपासणी, पिण्याच्या पाण्याची अनुजैविक शास्त्रीय तपासणी, जिवाणूंची तपासणी, जर एखादी रोगाची साथ असेल तर रक्त नमुना विषम ज्वर जिवाणूची तपासणी करण्यात येते. वर्ष २०१३ च्या प्राप्त झालेल्या निधीमध्ये २५३ गावांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे उद्दिष्ट मार्च महिन्यापर्यंत होते. परंतु मे महिना उलटत आला तरी अद्यापही १६९ गावांतील योजना रखडल्या आहेत.

Web Title: Use of contaminated water for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.