मोबाईल चोरीसाठी कारचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST2021-06-29T04:04:46+5:302021-06-29T04:04:46+5:30

परशुराम मोहन गायकवाड,(२१, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, अहमदनगर), प्रवीण राजू जाधव (१९, रा. वाळुंडी नाका, शास्त्रीनगर, बीड), विठ्ठल सखाराम ...

Use of car for mobile theft | मोबाईल चोरीसाठी कारचा वापर

मोबाईल चोरीसाठी कारचा वापर

परशुराम मोहन गायकवाड,(२१, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, अहमदनगर), प्रवीण राजू जाधव (१९, रा. वाळुंडी नाका, शास्त्रीनगर, बीड), विठ्ठल सखाराम लष्करे(३४, रा. राजुरी, बीड) आणि सनी विजय पतंगे (२५, रा. गांधीनगर, बीड), अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. पिसादेवी रस्त्यावर कारमधून आलेले चार जण मोबाईल विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, बुधा शिंदे, हवालदार नरसिंग पवार, दिनेश बन, प्रकाश डोंगरे, संतोष मुदीराज, गणेश नागरे, सुरेश भिसे, विशाल सोनवणे आणि स्वप्निल रत्नपारखी यांच्या पथकाने चोहोबाजूने घेरून आरोपींना पकडले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याजवळ वेगवेगळ्या कंपन्यांचे पाच मोबाईल हॅण्डसेट मिळाले.

Web Title: Use of car for mobile theft