हजरत खाँजा बद्रोद्दीन यांचा उरुस उत्साहात

By Admin | Updated: April 29, 2015 00:53 IST2015-04-29T00:41:30+5:302015-04-29T00:53:01+5:30

परंडा : हजरत खाँजा बद्रोद्दीन की दो चारो दिन, च्या उदघोषाने अख्ख्ये परंडा शहर दुमदुमले. मंगळवारी हजरत खाँजा बद्रोद्दीन चिस्ती शहीद रहे

Ursus zeal of Hazrat Khaaja Badroddin | हजरत खाँजा बद्रोद्दीन यांचा उरुस उत्साहात

हजरत खाँजा बद्रोद्दीन यांचा उरुस उत्साहात


परंडा : हजरत खाँजा बद्रोद्दीन की दो चारो दिन, च्या उदघोषाने अख्ख्ये परंडा शहर दुमदुमले. मंगळवारी हजरत खाँजा बद्रोद्दीन चिस्ती शहीद रहे. अलैैही यांचा ६९५ वा उरूस उत्साहात पार पडला. उरूसास मुंबई, पुणे, उस्मानाबादसह बार्शी येथील हजारो भाविक सहभागी झाले होते.
येथील तहसील कार्यालयातून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उरूसाला सुरूवात झाली. सुरूवातील तहसील कार्यालयात मानाच्या चादरीला फातेहखाणी देवून तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या डोक्यावर मानाची चादर देण्यात आली. तसेच आ. राहुल मोटे, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, अ‍ॅड. नुरूद्दीन चौधरी, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या डोक्यावरील चादरी खाँजा साहेब यांच्या मानाच्या घोड्यावर चढविण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दिवाल, जिल्हा परिषदेचे गटनेते दत्ता साळुंके, नगरसेवक जाकीर सौदागर, उपसभापती मेघराज पाटील, सिद्धेश्वर पाटील, आरपीआयचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, माजी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संतोष सूर्यवंशी, माजी सरपंच नवनाथ जगताप, शिवसेना शहर प्रमुख सुभाष शिंदे, माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, शब्बीरभाई पठाण, आकिल जिनेरी, नगरसेवक इस्माईल कुरेशी, हारूण शेख, माजी नगरसेवक राहुल बनसोडे, माजी अर्थ व बांधकाम सभापती धनंजय सावंत, बापू मिस्किन, भाऊसाहेब खरसडे, धनंजय मोरे, उद्योजक भैरवनाथ शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख गौतम लटके, प्रा. विलास गायकवाड, पोलिस निरीक्षक हनुमंत वाळके, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धनंजय हांडे, माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, वाजीद दखनी, दीपक थोरबोले, अ‍ॅड. सुभाष वेताळ, हरिष कांबळे, भालचंद्र नेटके आदींची उपस्थिती होती.
तहसील कार्यालयातून निघालेला संदल वाजत-गाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक, टिपू सुलतान चौक, आठवडी बाजार मार्गे मंडई पेठ, महात्मा ज्योतिबा फुले चौक, कुऱ्हाड गल्ली, कुरेशी गल्ली मार्गे दर्गाह या ठिकाणी पोहचला. येथे खाँजासहाब की दो चारोदिनच्या उदघोषात मानाचा घोडा दर्गाहच्या पायऱ्या चढून मुख्य प्रवेशद्वारावर पोहचला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, दर्गाह परिसरात शोभेच्या दारूसह मोठी आतषबाजी करण्यात आली. संदल मिरवणुकीमध्ये करमाळा, पुणे, बार्शी येथील नामांकित बँडसह उस्मानाबाद येथील ढोलीबाजा व सनई पथकाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उरूसानिमित्त तहसील कार्यालय, डॉ. आंबेडकर चौक, शिवाजी चौक, कुरेशी गल्ली भागात रोषनाई करण्यात आली. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैैनात केला होता.(वार्ताहर)

Web Title: Ursus zeal of Hazrat Khaaja Badroddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.