शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरातच उरकला खरीप हंगाम

By admin | Updated: July 30, 2015 00:10 IST

बीड : यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने १५ जुनला जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली. मात्र १५ जुन ते १५ जुलै या कालावधीतच खरीपाचा पेरा, मशागत

बीड : यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने १५ जुनला जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली. मात्र १५ जुन ते १५ जुलै या कालावधीतच खरीपाचा पेरा, मशागत व पावसाने ओढ दिल्याने पिके मोडण्याची नामुष्कीही बळीराजावर आली आहे. तीन ते साडेतीन महिने चालणाऱ्या खरीप हंगाम यंदा मात्र केवळ महिन्याभरातच उरकला आहे. हंगामाच्या सुरवातीच्या काळात पावसाने जिल्ह्यात हजेरी लवली होती. त्या तोडक्या पावसाच्या जोरावरच खरीपाची पेरणी करण्यास सुरवात झाली होती. तुरळक ठिकाणी पाऊस होत असल्याने जिल्ह्यात २४ जुनपर्यंत २ लाख ७५ हजार २१४ हेक्टरवर म्हणजेच सरासरी लागवड क्षेत्रापैकी ४९ टक्के पेरा झाला होता. जुन अखेर पावसाने ओढ दिल्याने ४ लाख ८ हजार ३१६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकावरच शेतकऱ्यांनी भर दिला होता. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने जुलै महिन्यातच खरीपाचा पेरा केला जातो. मात्र, जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी पेऱ्यात घट होत गेली. पावसाने ओढ दिल्याने खरीपातील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी हलक्या मशागतीस सुरवात केली. आहे ती पिके जोपसण्याचा अट्टाहास शेतकऱ्यांनी केला. मात्र तब्बल गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस निरंक असल्याने पिके जागच्या जागी जळून जात आहेत. जोमात आलेल्या पिकांना उभारी देण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयत्न केले. धारुर तालुक्यातील कासारी परिसरात तर शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून पिके जगविण्याचा केविलवाणा प्रयोग केला मात्र पावसाने हजेरीच लावली नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ५ लाख २१ हजार ३४४ हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. कृषि विभगाकडून ३१ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास २ लाख ३४ हजारावर दुबार पेरणीची शक्यता वर्तिवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात यापैक्षाही अधिकच्या पिकांचे नुकसान झाले असल्याचे समजत आहे. पाण्याअभावी व सोसाट्याच्या वाऱ्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस पडल्यास दुबार पेरणी अन्यथा रब्बीची तयारी या उद्देशाने अनेक शेतकरी उभ्या पिकावर नांगूर फिरवत आहेत. माजलगांव, अंबाजोगाई आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांची मोडणी करण्यास सुरवात केली आहे. गत तीन वर्षाचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाही कापूस व सोयाबीनवरच भर दिला होता. याकरिता हंगामपुर्व जमिनीची मशागत, पेरणी त्यानंतर पिकांची मशागत तसेच पिकांची जपवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम प्रयत्नही केले मात्र सरतेशेवटी खरीप यंदाही फेल गेला असल्याची परिस्थिती आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात झालेल्या पीक मोडणीचा हेक्टरी आकडा अद्यापपर्यंत कृषि विभागाकडे आला नसल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे १५ जुलैला सुरवात झालेला खरीप हंगाम केवळ पावसाअभावी महिन्याभरातच मोडीत काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे शिवाय लाखोंची बि-बीयाणे जमिनीत गाडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.