औषधांवर असामान्य एमआरपी छापून ३ हजार पटीने होते विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 13:54 IST2019-03-11T13:47:25+5:302019-03-11T13:54:22+5:30
औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्या अवाजवी नफा कमावत आहेत

औषधांवर असामान्य एमआरपी छापून ३ हजार पटीने होते विक्री
औरंगाबाद : दी निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पी.आर. सोमाणी यांनी एका औषधी घोटाळ्याचा दावा केला आहे. औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्या औषधांवर असामान्य एमआरपी छापत ३ हजार पटीने विक्री करीत असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, औषधांवर छापल्या गेलेली एमआरपी किंमत ही मूळ किमतीपेक्षा २ ते ३ हजार पटींनी जास्त छापली जाते. औषध कंपन्यांच्या या प्रकारामुळे लोकांना दररोज लुटले जात आहे .यामुळे गरीब जनता पूर्णपणे बिनभोवाट भरडली जात आहे, असे सांगत सोमाणी यांनी याबाबत पुरावे, सत्यता आणि आकडेवारी दाखविली.