जिल्ह्यातील हमालांचे बेमुदत उपोषण सुरू
By Admin | Updated: May 24, 2017 00:35 IST2017-05-24T00:33:34+5:302017-05-24T00:35:34+5:30
उस्मानाबाद : मागील वर्षानुवर्षे होणाऱ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासन- प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील १०० हून अधिक हमालांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले़

जिल्ह्यातील हमालांचे बेमुदत उपोषण सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : मागील वर्षानुवर्षे होणाऱ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासन- प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील १०० हून अधिक हमालांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले़ महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले आहे़
६ आॅगस्ट २०११ च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार दरमहा नियमित माथाडी मंडळाने निश्चित केलेल्या दराने मजुरी व लेव्ही न भरल्याने १८/२०१२ वर कंत्राटे रद्द करणे, माथाडी मंडळाने निश्चित केलेल्या दराने हमाली व लेव्ही माथाडी मंडळाकडे पाठविणे या मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने शासन- प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे़ मात्र, या मागण्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ याच्या निषेधार्थ व या मागण्यांकडे शासन- प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल- मापाडी महामंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांसह जिल्ह्यातील १०० हून अधिक हमालांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले़ या उपोषणात विलास गायकवाड, बंडू कांबळे, मल्हारी तिबोले, अनंतराव उंदरे, मुकींद खुणे, पांडुरंग शेळके, भीमराव कुचेकर, नवनाथ गोडगे, बळीराम बोराडे यांच्यासह इतर हमाल मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़