शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अवकाळी संकट : आंब्यांसह मोसंबी, द्राक्ष, पपई, केळी फळबागा साफ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 14:32 IST

अनेक भागांत घेतली जाणारी उन्हाळी पिके व भाजीपाल्यालाही जबर फटका बसला.

औरंगाबाद : मराठवाड्याला शनिवारी मध्यरात्री व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात आंबा या फळपिकाला सर्वात मोठा फटका बसला. मोसंबी, चिकू, पपई, केळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. अनेक भागांत घेतली जाणारी उन्हाळी पिके व भाजीपाल्यालाही जबर फटका बसला. सोमवारी सकाळीही लातूर व उस्मानाबादच्या काही भागांत पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यात बागायती पिके साफपरभणी: शनिवारी रात्री जिल्ह्यातील परभणी, जिंतूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरावरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनालाही या नुकसानीचा अहवाल पाठविण्याच्या सूचना जिल्हास्तरावरुन देण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे, पिंगळी कोथळा, जोड परळी आणि जिंतूर तालुक्यातील आसेगाव, दुधगाव, सोन्ना व कान्हड या ठिकाणी गारपीट झाली होती. टाकळी परिसरातील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. तसेच जोड परळी शिवारात टरबूजांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. याशिवाय  काढून ठेवलेली हळद आणि कडब्याच्या वळ्यांचे नुकसान झाले.  

बीडमध्ये कांद्यांचे नुकसान  बीड : जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि सौम्य गारपिटीमुळे आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून पोखरी (ता. बीड) येथील आनंद काळे या शेतकऱ्याची बैलजोडी व चिंचवण (ता. वडवणी) येथील महादेव बाबासाहेब मात्रे यांच्या मालकीचे गाय वासरु ठार झाले. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात विजेचे सिमेंट खांब मोडून  पडल्याने रानमळा, अर्धमसला, भाटेपुरी, निपाणी जवळका येथील विद्युत पुरवठा खंडीत झाला. दुपारपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.

लातुरात मेघगर्जनेसह पाऊस लातूर : जिल्ह्यात काही भागात सोमवारी पहाटे मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस झाला़ लातूर शहरात रविवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि पावसाने हजेरी लावल्याने अचानक वीजपुरवठाही खंडित झाला़ शिवाय, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, चाकूर, उदगीर, लातूर तालुक्यातील हरंगुळ बु़, पाखरसांगवी, खाडगाव, रेणापूर परिसरात रिमझिम पाऊस झाला़ शिरूर अनंतपाळ तालुक्यात काही भागात आंब्याचे नुकसान झाले आहे़  

उस्मानाबादेतही पाऊस उस्मानाबाद : जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या भागाला रविवारी व सोमवारी सकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा जोरदार फटका बसला़ परंडा, भूम, वाशी व कळंब तालुक्यात पावसाची व वादळी वाऱ्याची तीव्रता अधिक होती़ परंडा व भूम तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब तसेच डीपीही आडव्या झाल्या आहेत़ परिणामी या भागातील वीजपुरवठा सायंकाळपर्यंत खंडीत होता़ सोमवारी सकाळी उमरगा तालुक्यातील येणेगूर परिसरात काहीकाळ जोरदार पाऊस झाला आहे़ या पावसामुळे उन्हाळी पिकांचे तसेच फळबागांचेही नुकसान झाले आहे़ शेतात पाणी साचल्याने परंडा, भूम तालुक्यातील शिवारांमध्ये कांदा तसेच पालेभाज्यांचे नुकसान झाले़ 

हिंगोलीतही वादळी वाराहिंगोली :  जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुसाट वाऱ्यासह वसमत तालुक्यातील आडगाव रंजे, हट्टा, शिरडशहापूर व कौठा येथे पाऊस झाला. तसेच सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सेनगाव तालुक्यात कडोळी, माझोड, तपोवन, गारखेडा, गोरेगाव परिसरात पाऊस झाला़ हळद उत्पादकांना फटका बसला आहे. 

नांदेड जिल्ह्यात फळपिकांचे नुकसान  नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे  नांदेडसह बिलोली, नायगाव, हदगाव, माहूर, देगलूर, किनवट, लोहा, अर्धापूर या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले़ त्यामुळे शेतातील ज्वारी, मका, तीळ या पिकांचे मोठे नुकसान झाले़ शेतकऱ्यांनी वाळत टाकलेल्या हळदीचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.  अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील केळीनेही माना टाकल्या आहेत़   

जालना जिल्ह्यात फळबागांना फटका  जालना : जिल्ह्याच्या बहुतांश भागात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील कोठा जहांगीर, कोळगाव, माळेगाव, घनसावंगी तालुक्यातील देवहिवरा, सागर सहकारी साखर कारखाना, तनवाडी तर बदनापूर तालुक्यातील कंडारी, उज्जैनपुरी परिसरात गारपीट झाली. या गारपिटीमुळे अनेकांच्या शेतातील उन्हाळी बाजरीसह द्राक्ष, मोसंबी, चक्कू, पपई, केळी फळबागा, आंब्याला मोठा फटका बसला. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा परिसरातील भोपळ्याची शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांच्या शेतातील शेडनेटचेही मोठे नुकसान झाले. शिवाय कांदा बिजोत्पादनाही गारपिटीचा फटका बसला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRainपाऊसFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा