शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर; लातूर, धाराशिवमध्ये १२ महसूल मंडळांत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:56 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू; १० जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : भर उन्हाळ्यात मराठवाड्यात पावसाळ्याची अनुभूती येत आहे. आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला असून फळबागा, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धाराशिवमध्ये सात, तर लातूर जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अंजना, भोरडी, गिरिजा नदीला पूर आला असून, वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत.

मे महिन्यातच धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पर्जन्यमापकावर झालेल्या नाेंदीनुसार गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली.

लातूर शहरासह औसा, निलंगा तालुक्यांत बुधवारी रात्री मुसळधार अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत २२ मंडळांमध्ये ३० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोलीतही वादळी पावसामुळे पिकांसह महावितरणचेही खांब पडल्याने नुकसान झाले.आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्याची वेळ असताना मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू; १० जण जखमीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आता जीवावर उठला असून, बुधवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे घराची भिंत पडून कन्नड येथे एका १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले. पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे घराची भिंत कोसळून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. फुलंब्री तालुक्यात ११ घरांची पडझड झाली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडाRainपाऊस