शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका; ११ हजार हेक्टरवर नुकसान, संथ पंचनामे, मदत कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:04 IST

अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका;  वीज पडून २५ जणांचा मृत्यू; ४०० जनावरेही दगावली

छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात सुमारे पंचवीस दिवसांच्या कालावधीत मराठवाड्याला अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला. अवकाळी पावसाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. एकट्या बीड जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. वीज पडून आठही जिल्ह्यांत मिळून २५ असून, २९ जण जखमी झाले आहेत. तर सुमारे ४०० जनावरे दगावली आहेत. हळद, भुईमूग, ज्वारी, कांदा यासह केळी, आंबा या पिकांना मोठा फटका बसला आहे.

बीड आणि परभणी जिल्ह्यात काही घरांची पूर्णतः पडझड झाली असून, ८४ घरे अंशतः कोसळली आहेत. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील सुमारे ६०० गावांना फटका बसला असून, सात हजारांपेक्षा अधिक शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे.नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात हळद पिकाला मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात बागायती क्षेत्र असलेल्या ४३५४.७५ हेक्टर व फळ पिकांचे १६७.९२ हेक्टर, असे एकूण ४५२२. ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदेड : ४८१ हेक्टरचे नुकसानसुमारे १६ दिवस चाललेल्या या मान्सूनपूर्व पावसाने ७९२ शेतकऱ्यांची ४८१.६२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. उन्हाळी हंगामातील तीळ, भुईमूग, ज्वारी, हळद, केळी, कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बागायती व भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. तसेच नदी, नाल्यांना पूर आल्याने लगतची शेती खरडून नुकसान झाले आहे.  विजेच्या कडकडाटामुळे जिल्ह्यात दहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. नायगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील दोन शेतकरी वीज पडल्याने जखमी झाले असून, सांगवी येथील चंद्रकांत महागावे या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विशेषतः नायगाव, मुखेड, मुदखेड, कंधार, उमरी, भोकर, धर्माबाद, देगलूर, किनवट, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. नायगाव तालुक्यात सुमारे ७०० शेतकऱ्यांचे ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या तालुक्यात १५६ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.

बीड : साडेचार हजार हेक्टरला फटकाफळपिकांचे मोठे नुकसान; १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या२२८.९ मिमी पाऊस झाला.अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.१४ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.शेतीचे नुकसान : बागायती ४३५४.७५ हेक्टर व फळपिके १६७.९२ हेक्टर, असे एकूण ४५२२. ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लातूर : फळपिकांचे मोठे नुकसानजिल्ह्यात शेतकरी आत्महत्या नाही२३९.४ मिमी पाऊस झाला.आंबा, पपई, खरबूज, चिकू, पेरूसह टोमॅटो, सिमला मिरची, शेवग्याचे नुकसान.जिल्ह्यात २ हजार ३८७. ०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू झाले आहेत.शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना नाही.

हिंगोली : मे महिन्यात १३६.८ मिलिमीटर- १२९.९० हेक्टरकेळी, पपई, हळद या पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून जिल्ह्यात पंचनामे सुरू आहेत.- मे महिन्यात ४ शेतकरी आत्महत्या झाल्या.

परभणी : १३१ मिलिमीटर पाऊस झाला.पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे पंचनामे नाहीत.मे महिन्यात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

सर्व आशा, अपेक्षांचा स्वप्नभंगरात्रंदिवस मेहनत करून टोमॅटोला चांगली बाजारपेठ मिळेल, या आशेने अडीच एकरांत टोमॅटोची यशस्वी लागवड केली. परंतु अवकाळी पावसाने शेतात पाणीच पाणी झाल्याने डोळ्यांदेखत टोमॅटोचा अक्षरशः चिखल झाला. त्यामुळे आमच्या सर्व आशा, अपेक्षांचा स्वप्नभंग झाला.-कृष्णा दादासाहेब थोरवे, शेतकरी, कुंडी वाहिरा, ता. आष्टी

शेतमालाचे पैसे नाही तर चिखलच हातीआमची पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली. आमचे सर्व रस्ते बंद झालेत, मजुरांचे पैसे देणे बाकी आहे. सध्या पेरणीचे दिवस आलेत. खते, बी-बियाणे कुठून आणायचे? मुलांची फीस आहे. कांद्याचे पैसे हातात येण्याऐवजी कांद्याचा चिखलच आमच्या हाती आला आहे. आम्ही कसं करायचं?- महेश दरेकर, शेतकरी, शिदेवाडी, ता. आष्टी

वादळीवाऱ्याने प्रचंड नुकसानमे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस व वादळी वारे वाहिल्याने केळीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दोन एकरांत केळीची लागवड केली होती. जवळपास ३ ते ४ लाख रुपयांचे वादळात नुकसान झाले आहे.-बालाजी जाधव, शेतकरी, म्हतारगाव, ता. वसमत

कांद्याची नासाडी झालीयावर्षी एका एकरमध्ये कांदा लागवड केली होती. लागवडीसाठी ३५ हजार रुपये खर्च झाला. ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने थैमान घातले. सतत पाऊस होत असल्याने कांद्याला जमिनीतच सड लागली. ७० टक्के कांद्याची नासाडी झाली.- इमरान खान अजमत खान पठाण, जवळा पांचाळ, ता. कळमनुरी

मदतीचा हात द्यावासततचा पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मदतीचा हात द्यावा. कारण, पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यातच अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.-योगेश पवार, चाभरा, ता. हदगाव.

टॅग्स :RainपाऊसCropपीकMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी