शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:53 IST

काढणीला आलेली ज्वारी आणि सुर्यफुल, कांदा पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.

सोयगाव/सिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्याला मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक वादळीवाऱ्यासह झालेल्या माध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले रब्बी पिके आणि फळबागांना याचा फटका बसला आहे. 

सोयगावसह तालुक्यात पहाटे दोन वाजेपासून सुरू असलेल्या अवकाळीच्या रिपरिपीमुळे रब्बीसह फळबागांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा काही भागात जोर अधिक होता. त्यामुळे रब्बी पिके आडवी पडली आहेत. काढणीला आलेली ज्वारी आणि सुर्यफुल, कांदा पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. बनोटी भागात अवकाळी पावसाची  रिपरिप बुधवारी दुपारी उशिरापर्यंत सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, तहसीलदार रमेश जसवंत यांनी तातडीने महसूल यंत्रणेला गावनिहाय नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 

तसेच सिल्लोड तालुक्यात मंगळवारी रात्री अचानक विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बुधवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. यामुळे सोंगणीला आलेला गहू, हरभरा, सूर्यफूल, व कांदा सिडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, सरकारी दप्तरमध्ये सध्यातरी नुकसानीची नोंद नाही. 

भराडी अंधारी रोडवर अवकाळी पावसामुळे  उपळी जवळील रस्ता चिखलमय झाला होता यामुळे अनेक वाहने त्यात फसली होती तारेवरची कसरत करून वाहन धारकांना वाहन काढावे लागले अनेक मोटार सायकल स्वार घसरून पडले. पानवडोद खुर्द शिवारातील गट क्र 248 मधील शेतकरी गजानन दौड यांचा जवळपास २ एक्कर क्षेत्रावरील गहू आडवा झाला.याच प्रमाणे तालुक्यातील अजिंठा, शिवना, गोळेगाव, निल्लोड, भराडी, बोरगाव बाजार, आमठाणा, सिल्लोड,अंभई सर्कल मधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तालुक्यात ६ मिलिमीटर पाऊस, तालुक्यात मंडळ निहाय झालेला पाऊस असा:-सिल्लोड ९ ,भराडी ३,अंभई ११, अजिंठा ५, गोळेगाव बु १२,आमठाणा ४,निल्लोड २,बोरगावबाजार २ असा एकूण ४८ मिलिमीटर पाऊस झाला तर सरासरी तालुक्यात ६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद