शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

संस्थाचालक सुरडकरच्या हत्येचा झाला उलगडा; शिक्षिकेचा पती अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 8:05 PM

तब्बल पंधरा दिवसांनी या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला यश

औरंगाबाद: इंग्रजी शाळाचालक विश्वास चंद्रशेखर सुरडकर (रा. श्रीकृष्णनगर,सिडको एन-९ ) यांच्या हत्येप्रकरणी शहर गुन्हेशाखेने शिक्षिकेच्या पतीला अटक केले. काही महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी १३ एप्रिल रोजी  पत्रकार परिषदेत दिली. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून खूनाच्या घटनेनंतर तब्बल पंधरा दिवसांनी या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला यश आले.

अज्जू उर्फ अजय बिसमील्ला तडवी (वय ३३,रा. नॅशनल कॉलनी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त म्हणाले की, विश्वा सुरडकर यांची हत्या ३० मार्च रोजी रात्री दोरीने गळा आवळून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून हिमायत बागेतील बांबूबेटात करण्यात आली होती.  या हत्येप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीत चार जणांची नावे होती. त्यापैकी राजू दिक्षीतला पोलिसांनी अटक करून चौकशी केली. अन्य लोकांचीही चौकशी केली. मात्र या घटनेशी त्यांचा संबंध दिसत नव्हता. एवढेच नव्हे तर विश्वास यांच्या जवळच्या आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित असे समुारे ५० जणांची चौकशी करून त्यांना सोडून दिले. 

विश्वास यांचे घर ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.  सीसीटिव्ही कॅमेऱ्यात घटनेच्या रात्री अज्जू तडवी हा घरी जाताना दिसला. यामुळे आज १३ एप्रिल रोजी दुपारी पोलिसांनी अज्जूला गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि अन्य अधिकारी,कर्मचाऱ्यांनी उचलले, चौकशीअंती त्याने विश्वासची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्या बुटावर रक्ताचे पुसटसे डाग आणि महत्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला. हा खून करण्याचा उद्देश काय, याबाबत अज्जू सध्या उलट-सुलट उत्तरे पोलिसांना देत आहे.  न्यायालयाकडून त्याची पोलीस कोठडी घेऊन याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली जाणार आहे. 

अज्जूची पत्नी होती विश्वास यांच्या शाळेवर कार्यरतआरोपी अज्जू हा हडको कॉर्नर येथे खाद्य पदार्थ विक्रीचा गाडा चालवितो. मृत विश्वास सुरडकर यांच्या शाळेवर आरोपी अजयची पत्नी शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र काही कारणामुळे २०१५मध्ये त्यांनी नोकरी सोडली होती. तेव्हापासून अज्जू आणि मृत विश्वास यांच्यात चांगली ओळख होती. दोघे सतत परस्परांना भेटत. अज्जूच्या गाड्यावर खाद्य पदार्थ खाण्यासाठी विश्वास जात असे.