विद्यापीठाचा बॉक्सिंग संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:47 IST2019-02-19T00:44:47+5:302019-02-19T00:47:01+5:30
उदयपूर येथे २१ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे. रवाना झालेल्या संघात सागर भवरे, सूरज बचके, उस्मान शेख, रोहन पटेकर, अनिकेत सलामपुरे, शुभम निकम, कैलास गुसिंगे, सचिन चव्हाण व सतीश सावंत यांचा समावेश आहे.

विद्यापीठाचा बॉक्सिंग संघ रवाना
औरंगाबाद : उदयपूर येथे २१ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे. रवाना झालेल्या संघात सागर भवरे, सूरज बचके, उस्मान शेख, रोहन पटेकर, अनिकेत सलामपुरे, शुभम निकम, कैलास गुसिंगे, सचिन चव्हाण व सतीश सावंत यांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक म्हणून डॉ.संदीप जगताप जाणार आहेत. या संघाला संदीप जगताप, अजय जाधव व लक्ष्मण कोळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेला सागर भवरे, रोहन पटेकर, सूरज बचके, कैलास गुसिंगे यांच्याकडून प्रशिक्षक संदीप जगताप यांना पदकांच्या अपेक्षा आहेत. या खेळाडूंना विद्यापीठाचे कुलगुरूप्रो. बी. ए. चोपडे, अशोक तेजनकर, कुलसचिव साधना पांडे, क्रीडा संचालक दयानंद कांबळे, सिनेट सदस्य पंकज भारसाखळे आदींनी शुभेच्छा दिल्या .