विद्यापीठ पाच दिवस बंद

By Admin | Updated: September 10, 2016 00:24 IST2016-09-10T00:16:25+5:302016-09-10T00:24:31+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कामकाज १३ सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस बंद राहणार आहे.

The university closed for five days | विद्यापीठ पाच दिवस बंद

विद्यापीठ पाच दिवस बंद

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कामकाज १३ सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. ९) विद्यापीठाने महालक्ष्मी आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नैमित्तिक सुटी घेतली. १० तारखेला दुसरा शनिवार आणि ११ तारखेला रविवार असल्याने कामकाज बंद राहणार आहे. विद्यापीठ वर्धापन दिनाच्या निमित्ताने काम केल्याची पर्यायी सुटी सोमवारी (दि. १२) रोजी घेण्यात आली आहे. तर १३ तारखेला बकरी ईद असल्याने शासकीय सुटी आहे. यामुळे विद्यापीठाचे कामकाज सलग पाच दिवस बंद राहणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनीही आपापल्या गावी धाव घेतली आहे. यानंतर १५ रोजी गणपती विसर्जन असल्याने आणि पुढे शुक्रवार, शनिवार असल्याने १८ तारखेपर्यंत सुट्यांचा माहोल राहणार आहे.

Web Title: The university closed for five days