साखर वाटून रेल्वे भाडेवाढीचा अनोखा आनंदोत्सव
By Admin | Updated: June 24, 2014 01:08 IST2014-06-24T00:49:44+5:302014-06-24T01:08:15+5:30
औरंगाबाद : रेल्वे प्रवासी व मालवाहतूक भाडे दरात केलेल्या वाढीचा अनोखा आनंदोत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने साजरा केला.

साखर वाटून रेल्वे भाडेवाढीचा अनोखा आनंदोत्सव
औरंगाबाद : रेल्वे प्रवासी व मालवाहतूक भाडे दरात केलेल्या वाढीचा अनोखा आनंदोत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने साजरा केला. रेल्वेस्थानकावरून प्रवासासाठी निघालेल्या महिलांना हळदी-कुंकू लावत साखर वाटून सरकारचा हा गोड निर्णय सर्वांना सांगण्याची गांधीगिरी करण्यात आली.
‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गोरगरीब प्रवाशांना गोड बातमी दिल्याने हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानक गाठले व तेथील महिला प्रवाशांना हळदी-कुंकू लावून साखर वाटली.
ही गांधीगिरी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस कीर्ती उढाण, सीमा थोरात, यशस्वी वाघमारे, सुभद्रा जाधव, स्नेहा बनसोडे, मंजूषा पवार, उषा कल्ले, सुवर्णा सोमवंशी, मीनाक्षी पवार, वैशाली गुंड, प्रतिभा वैद्य यांनी केली.