शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:44 IST

औरंगाबाद : देवळाई परिसरात विसर्जन तलावालगत मोकळ्या जागेवर एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला असून, अर्धनग्न अवस्थेत रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना मिळून आला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह पोलिसांना आढळून आला. ओळख पटू नये म्हणून मृताचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे.

ठळक मुद्देश्वान घुटमळले: ओळख पटू नये म्हणून चेहरा केला विद्रूप

औरंगाबाद : देवळाई परिसरात विसर्जन तलावालगत मोकळ्या जागेवर एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला असून, अर्धनग्न अवस्थेत रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना मिळून आला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह पोलिसांना आढळून आला. ओळख पटू नये म्हणून मृताचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे.देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह विद्रूप करण्यात आल्याचे दिसले. घटनास्थळी श्वानपथक व फॉरेन्सिक टीमलादेखील पाचारण करण्यात आले होते. उत्तरीय तपासणीसाठी महिलेचा मृतदेह पोलिसांनी शासकीय दवाखान्यात पाठविला.श्वान रोडवर घुटमळलेश्वानपथक घटनास्थळी आले. श्वान मृताजवळून पुढे चालत रोडपर्यंत गेले आणि तेथेच घुटमळले. त्यामुळे महिलेचा खून करून मारेकरी रस्त्यापर्यंत जाऊन तेथून वाहनाने देवळाई चौकाकडे रवाना झाले असावेत, असा अंदाजदेखील पोलिसांनी वर्तविला.दरवर्षी जानेवारीत खून; पाचवी घटनाझाल्टा येथील रेल्वे लाईन, कादराबाद, बाळापूर आणि मंगळवारी देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा खून झाला. गेल्या चार-पाच वर्षांपासून चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातच खुनाचे प्रकार चिकलठाणा हद्दीत घडलेले आहेत, अशी चर्चा पोलीस वर्गात येथे सुरू होती.पोलीस उपअधीक्षक अशोक आम्ले, भुजंग, सहायक निरीक्षक संजय आहेर तसेच विविध अधिकाºयांंनी घटनास्थळी भेट दिली. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बेपत्ता महिलांच्या नातेवाईकांना बोलावून ओळख पटविण्याची प्रक्रिया करण्यात आली; परंतु ओळख पटली नाही. पोलीस ठाण्यातील मीसिंगविषयी देखील विविध ठाण्यांत कल्पना देण्यात आली. चार पथके रवाना करण्यात आले असून, महिला मजुरी करणारी असावी, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.खून झालेल्या महिलेचे वर्णनउंची चार-साडेचार फूट, गळ्यात मंगळसूत्र, हिरव्या रंगाची फिकट फुले असलेली साडी, गुलाबी ब्लाऊज, पिवळा परकर असा पेहराव आहे. कुणाला माहिती असल्यास चिकलठाणा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी