बेपत्ता मुलास घेऊन पथक हिंगोलीत दाखल
By Admin | Updated: June 20, 2014 00:08 IST2014-06-20T00:08:25+5:302014-06-20T00:08:25+5:30
ेहिंगोली : काकाकडेशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी घडल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून पोलिसांचे पथक शिर्डीला पोहोचले.

बेपत्ता मुलास घेऊन पथक हिंगोलीत दाखल
ेहिंगोली : काकाकडेशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी घडल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून पोलिसांचे पथक शिर्डीला पोहोचले. मात्र सदरील मुलगा तेथून नेवासा (जि.अहमदनगर) येथे आढळून आला असून त्याला घेऊन पोलिस गुरूवारी रात्री ८.३० वाजता हिंगोलीत पोहोचले.
शहरातील डॉ.संजय घुगे यांचा पुतण्या ऋषिकेश उध्दवराव घुगे (१५ रा. टाकळखोपा ता.जिंतूर)) हा हिंगोलीतील भारतीय विद्या मंदीर शाळेमध्ये यंदा दहावीच्या वर्गात शिकत आहे. शिक्षणासाठी तो काकाकडेच राहतो. सोमवारी रात्री तो नेहमीप्रमाणे काकांच्या दवाखान्यात झोपण्यासाठी गेला होता. मात्र मंगळवारी सकाळी तो त्याठिकाणी नव्हता. तसेच दवाखान्यामधील औषधी-गोळ्यांच्या बाटल्या, डब्बे अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. चोरीच्या संशयामुळे डॉ.घुगे यांनी पोलिसांसह श्वानपथकास पाचारण केले. श्वानाने कॉलनीतील दत्त मंदिराजवळील एका घरापर्यंत माग काढला. त्यानंतर पोलिसांनी सदरील बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला. मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास देशमुख नावाच्या मित्रास मोबाईलवर कॉल करून ‘मी नागपूरला आहे. कुणाला सांगू नकोस’असे ऋषिकेशने सांगितले होते. हा कॉल त्याने शिर्डीतून एका क्वॉईन बॉक्सवरून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. मोबाईल लोकेशन शोधून सदरील मुलास आणण्यासाठी जमादार मगन पवार, पोना शेख वसियोद्दीन यांचे पथक डॉ.संजय घुगे यांना सोबत घेऊन मंगळवारी रात्री शिर्डीला पोहोचले. परंतू तो शिर्डीत सापडला नाही.
दरम्यान, बुधवारी दिवसभराच्या शोधानंतर शनीशिंगणापूर येथे मुक्काम करून पथक पुन्हा गुरूवारी कामाला लागले. तब्बल १८ तासानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ऋषिकेश घुगे याला शोधण्यात यश आले. त्याला घेऊन पोलिस पथक गुरूवारी संध्याकाळी हिंगोलीत पोहोचले. हा मुलगा नेमका कशामुळे अचानक निघून गेला होता? त्याच्यासोबत कोणी होते का? याची विचारपूस रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होती.
(प्रतिनिधी)