बेरोजगार अभियंत्यांच्या विनास्पर्धा कामांची मर्यादा आता पाऊण कोटी
By Admin | Updated: August 26, 2014 00:24 IST2014-08-26T00:24:25+5:302014-08-26T00:24:25+5:30
उस्मानाबाद : स्थापत्य बरोजगार अभियंत्यांना यापूर्वी विनास्पर्धा देण्यात येणाऱ्या साठ लाख रूपये किंमतीपर्यंतच्या कामांची मर्यादा आता ७५ लाख रूपये करण्यात आली असून,

बेरोजगार अभियंत्यांच्या विनास्पर्धा कामांची मर्यादा आता पाऊण कोटी
उस्मानाबाद : स्थापत्य बरोजगार अभियंत्यांना यापूर्वी विनास्पर्धा देण्यात येणाऱ्या साठ लाख रूपये किंमतीपर्यंतच्या कामांची मर्यादा आता ७५ लाख रूपये करण्यात आली असून, याची कमाल मर्यादाही १५ लाखांवरून वीस लाख इतकी करण्याचा निर्णय शासनाने २५ आॅगस्ट रोजी घेतला आहे. तसेच ज्यांनी पाच लाख रूपये किंमतीपर्यंतची कामे यशस्वीरित्या केली आहेत, त्यांनाच ही सवलत उपलब्ध राहणार आहे.
यापूर्वी बेरोजगार अभियंत्यांच्या पंजीकरणाची मुदत दहा वर्षे तर नोंदणी वर्ग ५-अ मध्ये तीस लक्ष रूपये रकमेची कामे देण्यात आली होती. याशिवाय स्थापत्य बेरोजगार अभियंत्यांना साठ लक्ष रूपये किंमतीपर्यंतची कामे विनास्पर्धा दिली जात होती. ही मर्यादा कालमर्यादेनुसार वाढविण्याची मागणी विविध बेरोजार संघटनांनी शासनाकडे केली होती. यादी दखल घेत शासनाने हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार स्थापत्य बेरोजगार अभियंत्यांना प्रथम नोंदणी वर्ग ५ प्रमाणे म्हणजेच पन्नास लक्ष रूपयांपर्यंतची कामे देण्याचा तर पंजीकरणाची मुदत दहा वर्षे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्या नोंदणीकृत आहेत, त्यांचा नोंदणीच्या उर्वरित कालावधीसाठी देखील कामाची मर्यादा पन्नास लक्ष रूपये ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)