कमी खर्चात सेंद्रीय खत निर्मिती उपक्रम
By Admin | Updated: April 18, 2017 23:46 IST2017-04-18T23:43:40+5:302017-04-18T23:46:18+5:30
लातूर : कमी खर्चात, कमी वेळेत व कोठेही करता येणारा शिवांश सेंद्रीय खत निर्मिती उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

कमी खर्चात सेंद्रीय खत निर्मिती उपक्रम
लातूर : कमी खर्चात, कमी वेळेत व कोठेही करता येणारा शिवांश सेंद्रीय खत निर्मिती उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. कृषी विभागाच्या मदतीने कंपोस्ट खत निर्मितीचा हा उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी मंगळवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जनसाथी दुष्काळ निवारण मंचअंतर्गत कलापंढरी संस्थेने १८ दिवसांत तयार होणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत दाखविले. यावेळी शिवांश कंपोस्ट खताचे जिल्हा निमंत्रक बी.पी. सूर्यवंशी, मराठवाडा समन्वयक वीरभद्र पोटभरे, प्रभाकर सायगावकर यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, हा सेंद्रीय खत १८ दिवसांत तयार होतो. शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे. या खत निर्मितीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करणे आवश्यक आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने गावोगावी सेंद्रीय खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवावेत. या उपक्रमाची शेतकऱ्यांना माहिती झाल्यास शेतकरी स्वत: आपल्या शेतात खत निर्माण करून पिकांना वेळोवेळी देतील. त्यामुळे त्यांच्या उत्पादनातही वाढ होईल. (प्रतिनिधी)