शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित कार मजुरांसाठी ठरली काळ; पाचोड रोडवर दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:54 IST

अपघातानंतर चालकासह कारमधील सर्व प्रवाशी तेथून निघून गेले; मृत दोघेही परप्रांतीय मजूर असल्याची माहिती

- संजय जाधव पैठण (औरंगाबाद) : पैठण-पाचोड रोडवर कार व मोटारसायकल दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. बुधवारी दुपारी २.३० दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उलटली तर मोटारसायकल रस्त्याच्या कडेल्या केबलसाठी खोदलेल्या २० फूट खोल नालीत पडली. दोघेही हजारीबाग झारखंड येथील मजूर असल्याचे कळते.

पैठण शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर पाचोड-पैठण रस्त्याने दोघे मजूर मोटारसायकलने पैठणकडे येत असताना कार क्र एम एच -२० बी एन ९११४ या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाठिमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना उडवून दिले. कार रस्त्याच्या बाजूला खोदकामाने झालेले वळण पार करून उत्तमराव जाधव यांच्या शेतात जाऊन पलटी झाली. अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक दशरथ बरकुल, पोलीस हवालदार गोपाळ पाटील, श्रीराम चेडे, राम मोळके, स्वप्नील दिलवाले, व राजू जीवडे आदींनी घटनास्थळी जाऊन मोटारसायकल वरील दोघांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवले डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.

अपघातानंतर कारचालकासह कारमधील सर्व प्रवाशी तेथून निघून गेले होते. यामुळे कार कुणाची आहे, कारमध्ये किती जण होते, या बाबत काहीच समजू शकले नाही. पोलीसाकडून या बाबत माहिती घेण्याचे काम सुरू होते. कारचे सीट रक्ताने माखलेले होते. कारमध्ये लेडीज सँडल व चिप्स, पाणी असे साहित्य दिसून  आले आहे. पैठण-पाचोड रोडचे रूंदीकरण झाल्याने रस्त्यावरील वाहनांचा वेग अत्यंत वाढला असून वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू