शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

स्मृतिवन करारावरून युतीमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: September 19, 2014 01:15 IST

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर कारगिल स्मृतिवन विकासासाठी जिल्हा सैनिक मंडळासोबत केलेल्या करारावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीमध्ये वादंग उभे राहिले आहे.

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील ८ एकर जागेवर कारगिल स्मृतिवन विकासासाठी जिल्हा सैनिक मंडळासोबत केलेल्या करारावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीमध्ये वादंग उभे राहिले आहे. शिवसेनेचा उद्यान विकासाला विरोध नसून लपून केलेल्या कराराला विरोध असल्याचे स्पष्ट केले. तर भाजपाने तटस्थ भूमिका घेतली आहे. दरम्यान, आर.बी. हिल्स व परिसरातील नागरिकांनी आयुक्त पी. एम. महाजन यांची भेट घेऊन उद्यानाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे. कारगिल स्मृतिवनाचा करार झाल्याचे कळताच खा.चंद्रकांत खैरे प्रचंड संतापले. त्यांनी पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. स्मृतिवनाचा तो करार कुणालाही विश्वासात न घेता केला आहे. त्यामुळे तो करार थांबविण्यात येईल. वेळप्रसंगी कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महापौर कला ओझा यांनी नगररचना विभाग, नगरसचिव विभागाकडून त्या कराराच्या प्रती मागविल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्या जागेवर राज्य सैनिक मंडळाने नामफलक लावला. टीडीआरचे रहस्य कायम...बबाबाई पवार यांची काही जागा त्या ८ एकरमध्ये आहे. ती जागा वगळून उर्वरित जागा जिल्हा सैनिक बोर्डाकडे भाडेकरारावर दिली. सूत्रांच्या मते टीडीआर किंवा इतर मोबदल्यासाठी संबंधित जागा मालकांनी आयुक्तांची भेट घेतली होती. मागणी मान्य न झाल्यामुळे टीडीआर प्रकरणात काही घोळ झाल्याची शक्यता सूत्रांनी फेटाळली. नागरी कृती समितीची मागणीसर्वपक्षीय नागरी कृती समितीने महापौर ओझा, सभापती वाघचौरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, आयुक्त महाजन यांची भेट घेऊन उद्यान विकास प्रकरणात पालिकेने कुणाच्या विरोधाला जुमानू नये, अशी मागणी केली. यावेळी नगरसेवक पंकज भारसाखळे, सेवानिवृत्त एसीपी केंद्रे, जसवंतसिंग राजपूत, जगदीश चव्हाण, गंगाधर शेवाळे आदींची उपस्थिती होती.