उमरग्यात कडकडीत बंद

By Admin | Updated: October 27, 2015 00:22 IST2015-10-27T00:14:10+5:302015-10-27T00:22:15+5:30

उमरगा : नगरसेवक रज्जाक अत्तार व नगरसेवक वहाब रज्जाक अत्तार यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याचा आरोप करीत,

Umargaon cracked off | उमरग्यात कडकडीत बंद

उमरग्यात कडकडीत बंद


उमरगा : नगरसेवक रज्जाक अत्तार व नगरसेवक वहाब रज्जाक अत्तार यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याचा आरोप करीत, या प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी व दिवाणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या बंदला उमरगावासियांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये विविध सामाजिक संघटनासह काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांनी सहभाग नोंदविला़
नगराध्यक्षा केवलबाई औरादे यांच्या तक्रारीवरून माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार व नगरसेवक वहाब अत्तार यांच्या राहत्या घरी अनधिकृत नळ कनेक्शनची चौकशी मुख्याधिकाऱ्यामार्फत करण्यात आली होती. ८ आॅक्टोबर रोजी पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या चौकशी पंचनाम्यात अत्तार यांनी पदाचा गैरवापर करून आपल्या घरात मुख्य पाईपलाईनला अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी अत्तार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, मराठा सेवा संघ, अंजुमन मुस्लिम पंच कमिटी, माऊली प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, लहुजी शक्तीसेना, नगरसेवक संगीता पतगे, सतीश सुरवसे, राजेंद्र पतगे, उमाकांत माने, विजय दळगडे, एम. ओ. पाटील, आतिक मुन्शी, विजय वाघमारे, चंद्रशेखर पवार, अजित पटील, सुशिल दळगडे, महेश माशाळकर, बाबा काजी, भैय्या शेख, प्रदीप चिलोबा, एम. धोत्रे आदी सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व अन्य सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात येऊन आज सोमवारी सदर मागणीसाठी उमरगा शहर बंद करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातील व्यापारी महासंघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी महासंघाने याबाबत योग्य ती चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. गेल्या अनेक महिन्यांपासून नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या अंतर्गत वादामुळे शहराचा विकास थंडावला असून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही करण्यात आली़ सोमवारी सकाळपासूनच शहरातील शिवाजी चौक, इंदिरा चौक, सराफलाईन, पतंगे रोड, मलंग कॉम्प्लेक्स, माणिकवार कॉम्प्लेक्स, राष्ट्रीय महामार्गावरील कापड, किराणा, भुसार, पानटपऱ्यासह विविध व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. या बंदमुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. येथील शिवाजी चौक व अत्तार यांच्या पेट्रोलपंपासमोर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या बंदमुळे बाहेरगावावरून विविध शासकीय, निमशासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: Umargaon cracked off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.