शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंचा मोठा निर्णय; बंडखोर जैस्वालांची उचलबांगडी, किशनचंद तनवाणी नवे महानगर प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 17:05 IST

उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर महानगर प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे 

औरंगाबाद: शिवसेनेत मागील काही वर्षांपासून बाजूला पडलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यावर अखेर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची उचलबांगडी करत तनवाणी यांना महानगर प्रमुख पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. यामुळे जैस्वाल आणि तनवाणी यांच्या मैत्री व प्रतीस्पर्धेचा नवा अंक आता पाहण्यास मिळणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरु असताना अचानक शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडात शिवसेनेच्या ४० आमदारांचा सहभाग आहे. या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे ५ आमदारांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्ये विधानसभेचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील शिंदे गटात सामील आहेत. दरम्यान, सत्तांतरानंतर शिंदे गट आता पक्षावर देखील वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोरांची त्यांच्या पदावरून उचलबांगडी करत आहेत. आता ठाकरे यांनी आ. जैस्वाल यांचे महानगरप्रमुख पद काढून घेत त्याजागी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती केली आहे. तनवाणी आणि जैस्वाल यांचे मैत्री, एकमेकांच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवणे असे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. यामुळे शहरात पुन्हा एकदा जैस्वाल विरुद्ध तनवाणी असा सामना रंगणार आहे.

भाजप प्रवेश, पुन्हा घरवापसी आणि महानगरप्रमुख पद माजी आमदार किशनचंद तानवाणी हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल विरुद्ध भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर तनवाणी पुन्हा शिवसेनेत परतले. परंतु, त्यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी टाकली नव्हती. सेनेत बंडखोरी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी योग्य निर्णय घ्या अशा आशयाचे होर्डिंग शहरात लावले होते. तनवाणी मोठा निर्णय घेतील असे वाटत असताना आता त्यांची आगामी माहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचा वाढलेला प्रभाव, बंडखोर आमदारांची रणनीती आणि एमआयएमचे वाढते प्रस्थ अशी आव्हाने तनवाणी यांच्या पुढे आहेत. 

पक्ष बळकट करण्याचे लक्ष पक्षातील काही पदाधिकारी बंडखोर आमदारांकडे जात आहेत. मात्र, खरा शिवसैनिक टिकून आहे. आगामी काळात पक्ष वाढविण्यावर लक्ष असेल. शिवसैनिकांना बळ देण्याचे पहिले कार्य करणार असून त्यानंतर महापलिका निवडणुकांची तयारी करू. विधानसभा लढण्याचा विचार अद्याप केलेला नाही, पक्ष जो निर्णय घेईल त्यासाठी झोकून देऊन काम करत राहणार.- किशनचंद तनवाणी, महानगर प्रमुख, औरंगाबाद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीShiv Senaशिवसेना