शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:22 IST

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही.

छत्रपती संभाजीनगर - सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. परिणामी दिवाळी सरून आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही. यापार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौरा करणार आहे. "दगाबाज रे" या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकर्‍यांशी संवाद साधतील, अशी माहिती उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी रविवारी (दि.२) येथे पत्रकार परिषदेत दिली.

माजी विरोधीपक्षनेते दानवे म्हणाले की, निवडणूक आयोगाविरोधात काल मुंबईत आयोजित मोर्चात राजकीय पक्षासोबत सामान्य जनताही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यातून जनतेचा रोष दिसून आला. या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला भाजपने प्रती आंदोलन केले मात्र ते झाकोळल्या गेले.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने ३१ हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली. दिवाळीपूर्वी ते पॅकेजचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार होते. मात्र सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयाही दिला नाही. शिवाय जमीन खरडून गेली, घरेदारे वाहून गेली त्याची मदत अद्याप मिळाली नाही.

गेल्या महिन्यात आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता.  तेव्हा ठाकरे यांनी पॅकेजचे काय झाले हे पहायला दिवाळीनंतर पुन्हा  येईल, असे सांगितले होते. त्यानुसार ठाकरे हे दि.५,६, ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यांवर येणार आहेत.  या दौऱ्याची सुरवात बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होईल. या दौऱ्यात ते सुमारे ३४ तालुक्यातील विविध  गावांत  शेतकऱ्यांशी संवाद साधतील असे दानवे यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला उपनेते सुभाष पाटील, राजू वैद्य,सुकन्या भोसले आदी उपस्थित होते. 

हारतुरे, मंच नसेल

ठाकरे यांच्या मराठवाडाशेतकरी संवाद दौऱ्यात कोठेही हारतुरे नसेल. शिवाय कोठेही मंच उभारला जाणार नाही, ते वाड्यावर, चावडीवर शेतकऱ्यांशी संवाद साधतील,असे दानवे यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ,  सर्व खासदार, उपनेते, संपर्कप्रमुख यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी होतील, असे दानवे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray's Marathwada Tour: To interact with farmers on unfulfilled promises.

Web Summary : Uddhav Thackeray will tour Marathwada from November 5-8 to address farmer grievances regarding unfulfilled compensation promises after heavy rains. The tour, named "Dagabaj Re," aims to connect with farmers directly in their villages, without formal stages or garlands.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना