काँग्रेससोबत सरकार स्थापन करणारे उद्धव ठाकरेच खरे दगाबाज, संजय शिरसाटांचे टीकास्त्र
By बापू सोळुंके | Updated: November 8, 2025 18:34 IST2025-11-08T18:29:21+5:302025-11-08T18:34:47+5:30
उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांशी काही देणं घेण नाही.त्यांना केवळ राजकारण करायचं आहे.

काँग्रेससोबत सरकार स्थापन करणारे उद्धव ठाकरेच खरे दगाबाज, संजय शिरसाटांचे टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर:उद्धव ठाकरे यांचा 'दगाबाज रे'चा नारा हा त्यांच्या स्वत:साठीच आहे. कारण युतीमध्ये निवडणूक लढवून त्यांनी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले होते. उद्धव ठाकरे दगाबाज आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या दगाबाज संवाद दौऱ्यावर शिंदेसेनेचे प्रवक्ता तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज (दि. ८) टिका केली.
मंत्री शिरसाट म्हणाले की, एकतर ठाकरेंच्या मागे कोणीच नाही. पारावर बसून लोक जमवू शकत नाही ,यामुळे त्यांचे कोण ऐकणार आहे. ठाकरेंना शेतकऱ्यांशी काही देणं घेण नाही.त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. या दौऱ्यातही ते शेतकऱ्यांपेक्षा राजकारणावर अधिक बोलत असतात, असा आरोप शिरसाट यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविषयी शुक्रवारी रात्री केलेल्या ट्वीटविषयी विचारले असता ते म्हणाले, काही लोक राजकारणात स्वतः न्यायमूर्ती आहे अस दाखवता. आता सुरू असलेल्या पुणे जमिन खरेदी प्रकरणात त्यांनी बोलले नाही. त्यामुळे मी ट्विट केलं आहे.
अजित पवार यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक कौटुंबिक वातावरण वेगळे असते, मुल न विचारता निर्णय घेता का बघितलं पाहिजे. पार्थ पवार यांच्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही, याविषयी या विषयावर मुख्यमंत्री बोलले आहेत, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही जमिन लाटल्याचा आरोप झाला आहे. याकडे लक्ष वेधले असता शिरसाट यांनी तक्रार आली तर सरकारकडून चौकशी होईल असे सांगितले. पुणे येथील असो किंवा अन्य कुठलीही महार वतन जमीन विकत घेता येत नाही किंवा वापरता येतं नाही. जागा समाजासाठी असते, यावर ही आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मैत्रीपूर्ण होईल
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. निवडणुकीत कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढवायचं म्हणत आहे. यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. वैजापूर कन्नड,सिल्लोड,वैजापूर येथे आमचे आमदार आहे. त्यांचं ऐकावं लागते. भाजपकडे आहे त्या जागेवर त्यांनी लढवले पाहजे. याविषयीचे निर्णय स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात.
जरांगे आणि मुंडेची नार्कोटेस्ट व्हावी
मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहे. सरकारने दोघांची नार्को टेस्ट केली पाहिजे.यातून सत्य जनतेसमोर येईल,सरकारने याबाबत निर्णय घ्यावा,असेही शिरसाट म्हणाले.