शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: 'ओला दुष्काळसाठी कसले निकष, आता मंत्र्यांना चिखलात बुडवून काढायचं का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 15:38 IST

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली.

औरंगाबाद - राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी नियोजनानुसार दहेगाव आणि पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांनी आपली नुकसान झाल्याचं सांगत, व्यथाच मांडली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह सरकारवर जोरदार प्रहार केला. तसेच, शेतकऱ्यांनो सरकारवर आसूड चालवा, मी तुमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.   

उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात एका शेतकऱ्याने आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली. त्यावेळी. तुमच्या हाती आसूड आहे, तो तुमच्या हातात शोभून दिसतो. आमच्या हातात फोटोपुरता घेऊन तो शोभणार नाही. तुम्ही तो आसूड दाखवून सरकारला घाम फोडा, यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी सराकारला सवाल केला आहे. 

ओला दुष्काळ सरकारला दिसत नसेल, दिसत असूनही डोळेझाक करत असेल. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली, निदान बळीराजाशी तरी गद्दारी करू नका. मला कृषीमंत्र्यांची कीव येते, तुम्हाला आसुरी महत्त्वाकांक्षा असतील. पण, ज्या एका कारणासाठी तुम्ही सत्तांतर घडवलं. पण, निदान अन्नदात्याशी तरी गद्दारी करु नका. आणखी काय हवं, म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल. माझा शेतकरी दादा खोटं बोलू शकत नाही हा मला विश्वास आहे. त्यामुळेच, मी ऐन दिवाळीत इथं आलोय, माझ्यासोबत तुम्हीही आल्यानंतर येथील परिस्थिती, सत्य महाराष्ट्राला, देशाला दिसेल,असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

ओला दुष्काळ नक्कीच जाहीर झाला पाहिजे, मी आमची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे पीकांची नासाडी झालीय, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असा विभाग आहे. हे केवळ प्रतिकात्मक आहे. आता, ओला दुष्काळाचे निकष लावण्यासाठी मंत्र्यांना चिखलात बुचकळून काढायचं का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. निकष लावण्यासाठी नेमकं करायचं काय, हे केवळ सरकार उत्सवी आहे, मी गरज पडल्यास रस्त्यावर उतरेन. मी विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरणार नाही. तर, मी शेतकऱ्यांचा आवाज बनून रस्त्यावर उतरणार, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी