शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

Uddhav Thackeray: लवंगीच्या फुसक्या माळा, कुठलिही ठोस भूमिका नाही; सभेनंतर मनसेनं साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 09:19 IST

औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टिकेला उत्तर देताना, आमचं हिंदुत्व हे मनात राम आणि हाताला काम देणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, भाजपकडून सुपारी देऊन भोंगा वाजवला जात असल्याची टिकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मनसेच्या नेत्यांनी टिका करायला सुरुवात केली आहे. सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे. 

औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली. या सभेत त्यांनी हिंदुत्त्व, औरंगाबादचा पाणी प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे आज देशावर नामुष्कीची वेळ आली. बेताल वक्तव्य करणाऱ्या या प्रवक्त्यामुळे देश माफी मागणार नाही. कारण, भाजपचा प्रवक्ता हा देशाचा प्रवक्ता नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी, मनसेसह, राणा दाम्पत्यावरही त्यांनी नाव न घेता टिका केली. आता मनसेकडून या टिकेला आणि एकंदरीत सभेवर भाष्य करण्यात आलं आहे. 

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन निशाणा साधला. ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार, फक्त लावंगीच्या फुसक्या माळा, असे म्हणत देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच नाव न घेता टिका केली.   उद्धव ठाकरेंच्या या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. नामांतराच्या मुद्द्यावरुन केंद्रस्थानी असलेल्या या सभेला मोठी गर्दी होती. तर, शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती होती. या सभेत तेजस ठाकरेही भगवं उपरणं गळ्यात घालून दिसले. उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेनेनं मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे