बीड : नवीन रोहित्र बसविण्यासाठी लाच मागणाऱ्या महावितरणच्या लाईन हेल्परला सहायक सत्र न्या़ व्ही़ व्ही़ विदवंश यांनी दोन वर्षांची शिक्षा शुक्रवारी सुनावली़आत्माराम परशुराम शेरकर असे त्या लाईन हेल्परचे नाव आहे़ तो गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे महावितरणच्या कार्यालयात कामाला होता़ कोळगाव येथे जळालेले विद्युत रोहित्र बदलून नवीन रोहित्र बसविण्यासाठी २९ आॅक्टोबर २००९ रोजी बिभीषण करांडे यांच्याकडून ४ हजार ५०० रूपयांची लाच घेताना शेरकर यास पकडले होते़ गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात पाठविले होते़ सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरीत न्या़ विदवंश यांनी आत्माराम शेरकर यास दोषी ठरवित एक वर्षाची कैद व एक हजार रूपये दंड तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) प्रमाणे दोन वर्ष शिक्षा व दोन हजार रूपये दंड ठोठावला़ दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे़ सरकारी पक्षाच्या वतीने मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले़ त्यांना विनय बहीर, बनसोडे यांची मदत लाभली़ (प्रतिनिधी)
लाच घेतल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा
By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST