वीज पडून दोन महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:45 IST2017-10-14T00:45:31+5:302017-10-14T00:45:31+5:30

घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी आणि बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडून शुक्रवारी दोन महिलांचा मृत्यू झाला.

Two women killed by lightening | वीज पडून दोन महिला ठार

वीज पडून दोन महिला ठार

घनसावंगी / मानदेऊळगाव : घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी आणि बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे वीज पडून शुक्रवारी दोन महिलांचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर भाजली.
घनसावंगी तालुक्यातील म.चिंचोली, राजेगाव, घनसावंगी घोन्सी, डहाकेगाव परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आला. मच्छिंद्र चिंचोली येथील लघू तलाव ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली. दरम्यान, पानेवाडी येथे शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. ४ - ५ महिला शेतात कापूस वेचत असतांना पावसामुळे त्या शेतातील आखाड्यावर आश्रयास आल्या असता, शोभा लक्ष्मीकांत भागवत (२२) या जवळच असलेला कापसू झाकण्यासाठी गेल्या. त्याच वेळी अंगावर वीज कोसळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शोभा भागवत यांचे दोन वर्षापूर्वीच लग्न झाले होते. बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे उषा श्याम आढे (२३) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर त्यांच्या जाऊ सुनिता राम आढे (२१) या गंभीर भाजल्या. पाऊस आल्यामुळे दोघीही दुपारनंतर शेतातून घरी येत असताना ही घटना घडली.

Web Title: Two women killed by lightening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.