स्टॅम्प ड्युटी सवलतीचा लाभ घेऊन दोन महिला बनल्या घरमालकीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST2021-04-08T04:05:36+5:302021-04-08T04:05:36+5:30
विशेष म्हणजे, नोंदणी अधिकारी कविता कदम या महिला अधिकारी यांच्याकडे हा दस्त नोंदवला गेला. हर्सुल येथे प्लॉट ...

स्टॅम्प ड्युटी सवलतीचा लाभ घेऊन दोन महिला बनल्या घरमालकीण
विशेष म्हणजे, नोंदणी अधिकारी कविता कदम या महिला अधिकारी यांच्याकडे हा दस्त नोंदवला गेला. हर्सुल येथे प्लॉट नंबर ४४ मध्ये सुनिता विजय भोसले व हिराबाई विष्णू भोसले यांच्या नावाने नवीन राहते घर विकत घेण्यात आले. हे घर दोन्ही महिलांच्या नावाने विकत घेतले असल्यामुळे आज खऱ्या अर्थाने या दोन्ही महिला घराच्या मालक झाल्या आहेत.
यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक सोहम वायाळ व इतर कर्मचारी हजर होते. या दोघींचे पती वाळूज एमआयडीसीमध्ये काम करतात. कामगार वर्गातील एका कुटुंबातील भाड्याने राहणाऱ्या सुनिता भोसले यांना स्वतः चे नवीन घर रजिस्ट्री केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
१ एप्रिलपासून दिलेल्या या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वायाळ यांनी केले आहे.